गृह मंत्रालय
पद्म पुरस्कार 2026 साठी नामांकने सुरू
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2025 3:50PM by PIB Mumbai
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकने किंवा शिफारशी 15 मार्च 2025 पासून सुरू झाल्या आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने किंवा शिफारशी सादर करण्याची मुदत 31 जुलै 2025 पर्यंत आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने किंवा शिफारशी फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरच (https://awards.gov.in) ऑनलाइन सादर करता येतील.
पद्म पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर केले जातात. 'विशिष्ट कार्य' करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी अशा सर्व क्षेत्रांमध्ये किंवा विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवेसाठी पद्म पुरस्कार दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्यांसह सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र मानले जात नाहीत.
सरकार पद्म पुरस्कारांना "जनतेचे पद्म" मध्ये रूपांतरित करण्यास वचनबद्ध आहे. म्हणून, सर्व नागरिकांना स्वयं-नामांकनासह नामांकने किंवा शिफारशी सादर करण्याची विनंती केली जात आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतात.
नामांकने किंवा शिफारशींमध्ये वर निर्देशित पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेली सर्व संबंधित माहिती दिलेली असावी, ज्यामध्ये वर्णानात्मक स्वरूपात एक उद्धरण (जास्तीत जास्त 800 शब्द) समाविष्ट असावे. या उद्धरणात शिफारस केलेल्या व्यक्तीच्या (तिच्या/तिच्या) संबंधित क्षेत्रात किंवा विषयात विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवा याबाबत सविस्तर माहिती दिलेली असावी.
या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in ) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in ) 'पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2111565)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu