संरक्षण मंत्रालय
नव्याने उदयाला येणाऱ्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी झपाट्याने क्षमता वृद्धी करण्याची आवश्यकता हवाईदल प्रमुख एयर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांचाकडून अधोरेखित
Posted On:
12 MAR 2025 9:29AM by PIB Mumbai
सध्याच्या काळात निर्माण झालेल्या भू-धोरणात्मक परिदृश्यामध्ये नव्याने उदयाला येणाऱ्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी झपाट्याने क्षमता वृद्धी करण्याची आवश्यकता हवाईदलप्रमुख एयर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी अधोरेखित केली आहे. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज(डीएसएससी)मधील स्थायी अध्यापकांसोबत 80 व्या कर्मचारी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना ते संबोधित करत होते. हवाईदल प्रमुखांनी डीएसएससीला 11-12 मार्च 2025 रोजी भेट दिली.
एयर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी या अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांना परिवर्तनाचा अंगिकार करण्याचे, उदयोन्मुख धोक्यांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करण्याचे आणि भावी काळातील संघर्षांसाठी स्वीकारार्ह धोरणांची रचना करण्याचे आवाहन केले. संयुक्त कौशल्याच्या महत्त्वावर भर देत त्यांनी युद्धातील परिणामकारकता वाढवण्यासाठी तिन्ही दलांमध्ये एकात्मिक प्रशिक्षण आणि परिचालनात्मक समन्वयाची गरज अधोरेखित केली.
आपल्या भाषणात हवाईदल प्रमुखांनी भारतीय हवाई दलाच्या धोरणात्मक परिदृश्याची, क्षमता विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची आणि आधुनिक युद्धात एकत्रित मोहिमांच्या महत्त्वाची माहिती दिली. भारताच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यात भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी, प्रतिरोधकता आणि अचल बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली.
या भेटीदरम्यान हवाईदल प्रमुखांना डीएसएससीच्या प्रशिक्षण उपक्रमांची आणि सध्याच्या काळातील आधुनिक लष्करी सज्जतेमधील महत्त्वाचा पैलू असलेल्या सशस्त्र दलांमधील संयुक्तपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विशेषत्वाने भर देऊन केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. अतिशय खडतर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांच्या माध्यमातून भावी लष्करी नेतृत्व तयार करण्यामध्ये या संस्थेच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. या भेटीमधून भावी काळातील आव्हानांना तोंड देऊ शकणाऱ्या पुरेपूर सज्ज असलेल्या नेतृत्वाची सुनिश्चिती करून, भारतीय हवाई दलाची संयुक्त परिचालन क्षमता वृद्धिंगत करण्याविषयीची आणि तिन्ही दलांमधील परस्पर सहकार्याला बळकटी देण्याविषयीच्या वचनबद्धतेची पुष्टी झाली.

R7VL.jpeg)


***
SushamaK/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110662)
Visitor Counter : 30