पंतप्रधान कार्यालय
जपानच्या तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
05 MAR 2025 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 05 मार्च 2025
जपानच्या तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांची भारतातील विस्तार योजना आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' प्रति असलेली दृढ वचनबद्धता उत्साहवर्धक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
"तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील जपानी व्यापारी शिष्टमंडळाला आज भेटून आनंद वाटला. त्यांच्या भारतातील विस्तार योजना आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' प्रति दृढ बांधिलकी उत्साहवर्धक आहे. आमचा विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदार असलेल्या जपान बरोबर आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108675)
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada