माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजेंनी कृपया लक्ष द्यावेः ‘वेव्हज 2025 चॅलेंज’ मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरा करा
‘रिझोनेट : द ईडीएम चॅलेंज’ नावनोंदणीसाठीची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली
इलेक्ट्रॉनिक संगीतामधील तुमच्या प्रतिभेचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करून चमकण्याची संधी गमावू नका
Posted On:
05 MAR 2025 7:26PM by PIB Mumbai
मुंबई, 04 मार्च 2025
जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 होतकरू डीजेज, निर्माते आणि इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकार यांना चमकण्याची आणि इलेक्ट्रॉनिक संगीत आणि डीजे कलाकारीमधील त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्याची संधी देत आहे. त्यामुळेज जर तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते असाल आणि डीजे म्हणून काम करण्याची आवड असेल तर जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 हे तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय (I&B) भारतीय संगीत उद्योगाच्या(IMI) सहकार्याने ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या अतिशय उत्कंठावर्धक स्पर्धेचे आयोजन करत आहे. दृक-श्राव्य आणि मनोरंजन विश्वात तुमच्या सृजनशील प्रतिभेला आणि नवोन्मेषाला वाव देणाऱ्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा कोणत्याही देशातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक(EDM) ची रचना आणि निर्मितीचा पूर्वानुभव असलेले कलाकार, संगीत रचनाकार, संगीतकार आणि सादरकर्ते यांच्यासाठी खुली आहे. म्युझिक फ्युजन, इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि डीजे कलाकारी यांचे जागतिक केंद्र म्हणून भारताची ओळख बळकट करण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ ही संकल्पना असलेल्या या स्पर्धेत एका बंधात बांधलेल्या आणि सांस्कृतिक समृद्धी असलेल्या संगीताची निर्मिती करणाऱ्या जागतिक संगीत शैलींवर भर दिला जाणार आहे.

या संगीतमय स्पर्धेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद विचारात घेता ईडीएम चॅलेंजसाठी नावनोंदणी करण्याच्या मुदतीत 31 मार्च 2025 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पात्रतेच्या निकषांचे तपशील पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
नावनोंदणीसाठी येथे क्लिक करा
अधिक तपशील येथे उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रॉनिक संगीतप्रेमी आणि सादरकर्त्यांसाठी जागतिक इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक विश्वात आपला ठसा उमटवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ च्या महाअंतिम फेरीविषयी माहिती
या स्पर्धेची महाअंतिम फेरी मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणार आहे. या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या पहिल्या दहा जणांना इलेक्ट्रॉनिक संगीत उद्योगातील दिग्गजांसमोर आपली कला सादर करण्याची संधी असेल. या असाधारण संधीमुळे प्रेक्षक, रचनाकार, संगीत निर्माते आणि उद्योगातील दिग्गजांकडून दर्जेदार कलाकारांना कौतुकाची थाप आणि कलेला मान्यता मिळवता येणार आहे. तसेच महाअंतिम फेरीतील स्पर्धकांना उदयोन्मुख कलाकारांबरोबरच या क्षेत्रातील दिग्गज निर्मात्यांसोबत सहकार्य करण्याचे आणि त्यांच्यासोबत कलाविश्वासोबत जोडून घेण्याची देखील संधी मिळणार आहे. हे जग तुमचे सूर ऐकण्यासाठी आतुर आहे, तुमचा स्वरनाद घुमवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?
अधिक तपशीलासाठी येथे संपर्क करा - wavesatinfo@indianmi.org
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108592)