पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 4 मार्च रोजी अर्थसंकल्पोत्तर तीन वेबिनारमध्ये होणार सहभागी
वाढीचे इंजिन म्हणून एमएसएमई; उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जा मोहीम; नियामक, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभता सुधारणा हे वेबिनारचे विषय
परिवर्तनकारी अर्थसंकल्पीय घोषणांच्या अंमलबजावणीची कृती योजना विकसित करण्यासाठी वेबिनार एक सहयोगी व्यासपीठ म्हणून काम करतील
Posted On:
03 MAR 2025 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. या वेबिनार अंतर्गत सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (MSME) हे विकासाचे इंजिन;उत्पादन, निर्यात तसेच अणुऊर्जा अभियान; नियामक, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभता विषयक सुधारणा या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधितही करतील.
या वेबिनारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, उद्योगक्षेत्रातील आघाडीचे व्यवसाय उद्योजक तसेच व्यापार विषयक तज्ज्ञांना भारताच्या औद्योगिक, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक परस्पर सामाईक मंच उपलब्ध होणार आहे. या वेबिनार मधील चर्चा या प्रामुख्याने धोरणांची अंमलबजावणी, गुंतवणूक सुलभता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यावर भर दिला जाणार आहे. यातून अर्थसंकल्पातील परिवर्तकारी उपाययोजनांची सुरळीतपणे अंमलबजावणी करणे सुनिश्चित होऊ शकणार आहे. या वेबिनारमध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विविध विषयांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हे सर्वजण अर्थसंकल्पातील घोषणांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्नांची दिशा ठरवण्यात मदत करतील.
N.Chitale/N.Mathure/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107951)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam