सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे “दुग्धव्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता आणि चक्रीयता यावरील कार्यशाळेचे” केले उद्घाटन
ग्रामीण स्थलांतराची समस्या सोडवण्यासाठी तसेच लहान शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी दुग्धव्यवसाय हा एक महत्त्वाचा पर्याय
सहकार से शक्ती, सहकार से सहयोग आणि सहकार से समृद्धी या तीन तत्त्वांच्या आधारे मोदी सरकार लोकांसाठी नफा हा मंत्र साकारत आहे
श्वेत क्रांती 2.0 चे मुख्य ध्येय शाश्वतता आणि चक्रीयता हे आहे
Posted On:
03 MAR 2025 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे "दुग्धव्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता आणि चक्रीयता यावरील कार्यशाळेचे" उद्घाटन केले. दुग्धजन्य क्षेत्रातील संसाधनांची शाश्वतता, कार्यक्षमता आणि चक्रीयता यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'सहकार से समृद्धी' हे स्वप्न साकार करण्यास मदत होऊ शकेल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले की आज आपण श्वेत क्रांती 2.0 कडे वाटचाल करत असताना, शाश्वतता आणि चक्रीयता यांचे महत्त्व प्राधान्याने लक्षात येते. ते म्हणाले की, पहिल्या श्वेत क्रांतीच्या मदतीने आपण आतापर्यंत जे साध्य केले आहे त्याव्यतिरिक्त दुग्धव्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता आणि चक्रीयता अद्याप पूर्णपणे साध्य व्हायची आहे. शाह यांनी सांगितले की श्वेत क्रांती 2.0 चे मुख्य ध्येय शाश्वतता आणि चक्रीयता आहे आणि आपल्याला श्वेत क्रांती 2.0 च्या सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

अमित शाह म्हणाले की, भारताचे दुग्धव्यवसाय क्षेत्र देशाच्या तसेच ग्रामीण भागाच्या विकासात आणि भूमिहीन तसेच लहान शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावते. त्यांनी सांगितले की, यामुळे आपल्या देशाच्या पोषणाची काळजी घेतली गेली आहे, देशाला जगातील पहिल्या क्रमांकाचा दूध उत्पादक देश बनवण्यात योगदान दिले आहे आणि शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नाशिवाय अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवून दिले आहे.

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासमोर तीन उद्दिष्टे ठेवली आहेत - 5 ट्रीलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे आणि 2047 मध्ये पूर्णपणे विकसित देश बनणे. ते म्हणाले की, ही तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षेत्रातील सर्व शक्यतांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी एक यंत्रणा उभारावी लागेल.
ग्रामीण भागातील स्थलांतराच्या समस्येवर मात करण्याबरोबरच लहान शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी दुग्धव्यवसाय हा एक महत्त्वाचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सर्व शक्यतांचा संपूर्णपणे शोध घेण्याच्या दृष्टीने समग्र दृष्टिकोन बाळगून काम करण्यासाठी हे चर्चासत्र खूप उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
मोदी सरकार सहकार से शक्ती, सहकार से सहयोग आणि सहकार से समृद्धी या तीन तत्त्वांच्या आधारे लोकांसाठी नफा मिळवण्याचा मंत्र साकारत आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, आज देशात 23 राज्यस्तरीय संघटना आहेत परंतु आपण श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्याची आस बाळगली पाहिजे.
N.Chitale/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107927)
Visitor Counter : 17