संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डेझर्ट हंट-2025 युद्ध सराव

Posted On: 01 MAR 2025 9:50AM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाच्या वतीने 24 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर एक्सरसाइज डेझर्ट हंट 2025 हा एकात्मिक त्रि-सेवा विशेष दलांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले. या सरावात भारतीय लष्करातील एलिट पॅरा (विशेष दल) भारतीय नौदलातील मरीन कमांडो आणि भारतीय हवाई दलातील गरुड (विशेष दल) यांनी एकत्रितपणे विशेष युद्ध सरावात भाग घेतला. उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना त्वरित आणि प्रभावी प्रतिकार करण्यासाठी तिन्ही विशेष दलांच्या तुकड्यांमध्ये परस्पर कार्यक्षमता आणि समन्वय वाढवणे, हेच या उच्च-तीव्रतेच्या सरावाचे उद्दिष्ट होते. या सरावात हवाई हल्ला, अचूक हल्ला, ओलिसांची सुटका, दहशतवादविरोधी कारवाया, हवाई छत्र्यांमधून खाली येणे आणि शहरी युद्ध परिस्थितीत सैन्याच्या सज्जतेच्या तयारीची चाचणी घेण्यात आली. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या सरावाचे पर्यवेक्षण करत संयुक्त धोरणांवर शिक्कामोर्तब केले. भारतीय सशस्त्र दलांच्या अखंड आंतर-सेवा सहकार्याद्वारे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्याच्या वचनबद्धतेला चालना देण्यासाठी यामुळे एक मंच देखील उपलब्ध झाला.

***

S.Patil/R.Dalekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107455) Visitor Counter : 21