राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाचा (National Forensic Sciences University) पदवी प्रदान समारंभ संपन्न
Posted On:
28 FEB 2025 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (28 फेब्रुवारी 2025) गांधीनगर इथल्या राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाचा (National Forensic Sciences University) पदवीप्रदान समारंभाला पार पडला.
यावेळी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना संबोधित केले. आपल्या देशात न्यायाधारित सामाजिक व्यवस्थेला सर्वोत्कृष्ट व्यवस्था मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आपला वारसा आणि विकास यांचा संगम साधत न्यायाधारित विकसित भारत घडवत आहोत असे त्या म्हणाल्या. गेल्या काही वर्षांत केंद्रीय गृह मंत्रालयाने न्याय वैद्यक शास्त्राच्या भूमिकेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच या क्षेत्रातील सुविधा आणि क्षमता विकसित करण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
84DZ.jpg)
कोणतीही न्याय व्यवस्था जेव्हा ती खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होते, तेव्हाच ती व्यवस्था सक्षम असल्याचे मानले जाते असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी साठी विशेषतः समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना, न्याय्य पद्धतीने आणि जलदगतीने न्याय प्रदान करण्याचे ध्येय बाळगले पाहीजे, आणि त्यासाठी न्याय वैद्यक पुराव्यांचा आधारही घेतला पाहीजे असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी देशाच्या सुशासनात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
2990.jpg)
केंद्र सरकारने अलिकडेच लागू केलेल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांमध्ये गुन्हे अन्वेषण आणि पुराव्यांशी संबंधित बदल केेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या बदलांनुसार ज्या प्रकरणांमध्ये 7 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या शिक्षेची तरतुद आहे, अशा प्रकरणांमध्ये आता न्याय वैद्यक तज्ज्ञाने घटनास्थळी भेट देऊन तपास करणे बंधनकारक केले असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार, सर्व राज्यांमध्ये ठरावीक कालमर्यादेत न्याय वैद्यक सुविधांचा विकास केला जावा याची तरतूद केली आहे. अनेक कायद्यांमध्ये कालबद्ध पद्धतीने न्याय वैद्यक अनिवार्य केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. या बदलांमुळे न्याय वैद्यक तज्ज्ञांच्या मागणीत वाढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
4P4T.jpg)
तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल, विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात होत असलेल्या वेगवाने प्रगतीमुळे न्या वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या क्षमतांमध्येही वाढ होत आहे, पण त्याचवेळी गुन्हेगार देखील नवनवीन मार्ग शोधू लागले असल्याची जाणीवही त्यांनी आपल्या संबोधनातून करून दिली. आपली पोलीस यंत्रणा, अभियोक्ते आणि गुन्ह्यांसंबंधीच्या न्याय व्यवस्थेशी संबंधित व्यक्तींसाठी गुन्हे नियंत्रण आणि न्यायप्रदानाची प्रक्रिया सुलभ व्हायची असेल तर त्यासाठी, या सगळ्यांना गुन्हेगारांच्या तुलनेत अधिक हुशार व्हावे लागेल, तत्पर आणि सतर्क राहावे लागेल ही गरजही राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनातून अधोरेखीत केली. राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या योगदानामुळे देशात अतिशय सक्षम न्याय वैद्यक व्यवस्था निर्माण होईल, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढेल, आणि मुळातच गुन्हे करतांनाच गुन्हेगारांना भय वाटू लागेल असा विश्वासही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2107160)
Visitor Counter : 17