माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कम्युनिटी रेडियो कंटेंट चॅलेंज

Posted On: 27 FEB 2025 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025


परिचय

कम्युनिटी रेडियो केंद्रांमध्ये निर्मिती होणाऱ्या सृजनशील, परिणामकारक आणि नवोन्मेषी आशयाला सर्वांसमोर आणणे हा  कम्युनिटी रेडियो कंटेंट चॅलेंजचा उद्देश आहे. स्थानिक जनतेचे सक्षमीकरण करण्यामध्ये आणि एखाद्या प्रदेशाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यामध्ये त्यांच्या भूमिकांवर भर दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने कम्युनिटी रेडियो असोसिएशनच्या सहकार्याने या मंचाच्या माध्यमातून वेव्हजमध्ये क्रिएट इंडिया चॅलेंजच्या पहिल्या पर्वाअंतर्गत कम्युनिटी रेडियोंच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे. आतापर्यंत यामध्ये 14 परदेशी प्रवेशिकांसह 246 सहभागींनी आपली नावनोंदणी केली आहे.    

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची(वेव्हज) पहिली आवृत्ती ही एक आगळावेगळा हब ऍन्ड स्पोक मंच असून त्यावर संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा संयोग घडून येणार आहे. हा कार्यक्रम अतिशय प्रतिष्ठेचा जागतिक मंच असून जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे लक्ष भारताकडे वेधण्याचा आणि त्यांना भारतीय प्रतिभेसह भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी जोडण्याचा या मंचाचा उद्देश आहे.  

1 मे ते 4 मे 2025 या काळात मुंबईत जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर अँड जियो वर्ल्ड गार्डन्स येथे या शिखर परिषदेचे आयोजन होणार आहे.

प्रसारण आणि इन्फोटेन्मेंट च्या स्तंभाखाली कम्युनिटी रेडियो चॅलेंज ही स्पर्धा कम्युनिटी रेडियो लोकांना माहिती देण्यात आणि समुदायांना परस्परांशी जोडण्यात जे योगदान देत आहे त्याचा गौरव करणार आहे.  

स्पर्धेची उद्दिष्टे

नवोन्मेषाला प्रोत्साहन आणि सहकार्याला चालना देण्यामध्ये कम्युनिटी रेडियोचे सामर्थ्य आणि क्षमता यांची दखल घेऊन त्यांना जगासमोर आणून त्यांचा गौरव करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.

प्रवेशिका सादर करण्याच्या श्रेणी

वेव्हज स्पर्धा कम्युनिटी रेडिओ केंद्रांना(सीआरएस) पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रवेशिका सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहे. यामधील प्रत्येक श्रेणी समुदाय विकासाच्या महत्त्वाच्या पैलूवर केंद्रित आहे. विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सीआरएस करत असलेल्या प्रभावी कार्याला अधोरेखित करणे हा या श्रेणींचा उद्देश आहे.

· सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा:

· शिक्षण आणि साक्षरता:

· महिला आणि बाल विकास/ सामाजिक न्याय आणि पुरस्कृतता:

· कृषी आणि ग्रामीण विकास:

· सांस्कृतिक संवर्धन:

नावनोंदणीची मार्गदर्शक तत्वे

या स्पर्धेसाठी 28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत प्रवेशिका पाठवता येतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आणि वैध नूतनीकृत परवाना असलेल्या भारतातील सर्व कम्युनिटी रेडियो केंद्रांसाठी(CRS) ही स्पर्धा खुली आहे. प्रत्येक केंद्राला पाच श्रेणींपैकी केवळ एकासाठी प्रवेशिका सादर करता येईल. एकाच किंवा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

हा कार्यक्रम व्यावसायिकाने निर्मिलेला नसावा तसेच त्यात व्यावसायिक आवाजांचा सहभाग नसावा.

कम्युनिटी रेडिओ केंद्रांकडे अर्ज करून तयार केलेले कार्यक्रम पारितोषिकांसाठी विचारात घेतले जातील.

या कार्यक्रमाने इतर कोणत्याही संस्थेचे अथवा संघटनेचे बक्षीस जिंकलेले नसावे.

कार्यक्रम 1 जून 2023 ते 31 जून 2024 या कालावधीत सीआरएसद्वारे प्रसारित झालेला असावा.

निर्मिती प्रक्रियेत असलेल्या आणि उपरोल्लेखित कालावधीत प्रसारित न झालेल्या कार्यक्रमांच्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

प्रवेशिकेसोबत कार्यक्रमाची थोडक्यात माहिती देणारा एक परिच्छेद असला पाहिजे.(हिंदी/इंग्रजी भाषेत अडीचशे शब्दांत लिहिलेले सार)

सर्व आवश्यक कागदपत्रे आणि कार्यक्रमाची ऑडियो फाईल (एमपी3 स्वरुपात) यांसह प्रवेशिका सादर झाल्या पाहिजेत.

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

सादरीकरणाचे निकष

स्पर्धकांच्या कार्यक्रमाने त्यातील सामग्री आणि प्रभाव अधोरेखित करण्यासाठी प्रारुप, कालावधी आणि सहाय्यक साहित्यासह विशिष्ट निकषांची पूर्तता केली पाहिजे.

कार्यक्रमाचे निकष : प्रत्येक प्रवेशिका म्हणजे अर्ध्या तसंच कार्यक्रम अथवा मालिकेतील एक भाग असावा.

कार्यक्रमाचे स्वरूप: प्रवेशिकांमध्ये खुल्या चर्चा, माहितीपट, सांगीतिक कार्यक्रम, शैक्षणिक साहित्य, फोन इन कार्यक्रम अथवा कोणत्याही इतर शैलीतील कार्यक्रमांचा समावेश असला पाहिजे.

सहाय्यक साहित्य:
 

कार्यक्रमाचे वर्णन: कार्यक्रमातील आशय आणि उद्देश यांचा थोडक्यात आढावा द्यावा लागेल.

प्रभाव विषयक अहवाल: कार्यक्रमाची पोहोच आणि समुदायावरील प्रभाव यांचे तपशील द्यावे लागतील.

श्रोत्यांची प्रशस्तीपत्रे: श्रोत्यांनी कार्यक्रमाविषयी दिलेले अभिप्राय तसेच सूचना यांचा यात समावेश व्हावा.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

सादरीकरण पोर्टल:

प्रवेशिका स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावरून पाठवल्या पाहिजेत. सर्व साहित्य योग्य पद्धतीने अपलोड झाल्याची खात्री करून घ्यावी.

प्रारुप:

ऑडियो फाईल्स एमपी3 स्वरूपातच पाठवाव्या. इतर कागदपत्रे केवळ पीडीएफ स्वरूपातच पाठवावी.

मूल्यमापनाचे निकष

वेव्हज स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचे न्याय्य आणि व्यापक मूल्यमापनाची खात्री होण्याच्या दृष्टीने प्रत्येक कम्युनिटी रेडिओ कार्यक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी खालील मापदंड वापरण्यात येतील:

मूल्यमापन निकषाचे मापदंड

कम्युनिटी रेडिओ सामग्री स्पर्धा

1.  समर्पकता आणि प्रभाव

2.  अस्सलता आणि सर्जनशीलता

3.  निर्मितीचा दर्जा

4.  समुदायाचा सहभाग

5.  शैक्षणिक मूल्य

6.  संस्कृती संवर्धन

7.  शाश्वतता आणि प्रतिकृती निर्मितीची शक्यता

8.  सामाजिक बदल आणि समर्थन

अंतिम निवड

माध्यमांतील प्रसिध्द व्यक्ती आणि भारतीय कम्युनिटी रेडिओ संघटनेचे (सीआरएआय) प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या तज्ञांच्या पथकातर्फे दोन स्तरीय मूल्यांकन प्रक्रियेद्वारे वेव्हज स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण करण्यात येईल

निवडीचे निकष

परीक्षक

माध्यम क्षेत्रातील सुप्रसिध्द व्यक्ती

भारतीय कम्युनिटी रेडिओ संघटनेचे प्रतिनिधी

चाळणी प्रक्रिया

पहिल्या 5 प्रवेशिकांची निवड करण्यात येईल.

दोन स्तरीय मूल्यांकन
 
अंतिम निवड:  मूल्यमापन निकषाच्या आधारावर प्रवेशिकांतून विजेते शॉर्टलिस्ट करण्यात येतील आणि अंतिम फेरीसाठी पाठवण्यात येतील.

निष्कर्ष

वेव्हज स्पर्धेचा भाग असलेली कम्युनिटी रेडिओ सामग्री स्पर्धा भारतभरातील कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या प्रभावी कार्याचा सन्मान करुन त्यांचा गौरव करण्यासाठीचा मंच प्रदान करते. नवोन्मेष आणि सहयोग यांना प्रोत्साहन देऊन ही स्पर्धा स्थानिक समुदायांना सक्षम करण्यात आणि महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यात कम्युनिटी रेडिओची अत्यावश्यक भूमिका अधोरेखित करते.

संदर्भ

यासंदर्भातील पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

N.Chitale/S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2106722) Visitor Counter : 20