वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतातील उत्पादन आणि फिनटेक स्टार्टअप परिसंस्थेत नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या विस्तारासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि पेटीएम आले एकत्र
Posted On:
26 FEB 2025 11:13AM by PIB Mumbai
भारतातील उत्पादन आणि फिनटेक स्टार्टअप परिसंस्थेत नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या विस्तारासाठी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी ) आणि पेटीएम (Paytm, One97 Communications Limited) यांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या सहकार्याचा एक भाग म्हणून, पेटीएम स्टार्टअप्सना मार्गदर्शन, पायाभूत सहाय्य , बाजारातील संधी तसेच निधीपुरवठ्याच्या संधी उपलब्ध करून देईल , जेणेकरून त्यांना उद्योगाचा विकास आणि त्यातील नवनवीन आयाम गाठण्यासाठी मदत होईल.या उपक्रमाचा उद्देश उद्योजकांना आवश्यक संसाधनांसह सुसज्ज करून अत्याधुनिक आणि आर्थिक तंत्रज्ञान आधारित पेमेंट सोल्युशन्स विकसित करण्याची त्यांची क्षमता वाढवणे हा आहे.
डीपीआयआयटीच्या मते, या भागीदारीचे उद्दिष्ट फिनटेक हार्डवेअर स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण मार्गदर्शनाद्वारे समर्थन देणे, त्यांना पेमेंट आणि आर्थिक तंत्रज्ञान उपाय विकसित करण्यात मदत करणे हे आहे.तसेच हे सहकार्य उद्योग आणि सरकारी संस्थांच्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित करून आणि मार्गदर्शन प्रदान करून त्यांच्या नियमनावर आणि अनुपालन सहाय्यावर लक्ष केंद्रित करेल. याव्यतिरिक्त, ही भागीदारी त्यांना पायाभूत सुविधा तसेच बाजारपेठेतील संधी प्रदान करून पेटीएमच्या विस्तृत व्यापारी नेटवर्कचा लाभ मिळून स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादनांची चाचणी, प्रमाणीकरण आणि सुयोग्य परीवर्तन करण्यास सक्षम करेल
स्टार्टअप्ससाठी पेटीएम उपक्रमाचा एक भाग म्हणून,साउंडबॉक्स आणि PoS/EDC उपकरण निर्माते सारख्या फिनटेक हार्डवेअर निर्मात्यांना कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने समर्पित कार्यक्रम सुरू करेल.
या सहकार्यासह तंत्रज्ञानातील प्रगतीला चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या वचनबद्धतेला डीपीआयआयटी आणि पेटीएम यांनी दुजोरा दिला आहे.
***
S.Kane/S.Patgonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106366)
Visitor Counter : 19