माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हज अ‍ॅनिमे आणि मंगा स्पर्धा


ॲनिमेशन आणि कॉमिक्स संदर्भात भारतातील वाढत्या रुचीचा उत्सव

Posted On: 17 FEB 2025 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025

प्रस्तावना

वेव्हज अ‍ॅनिमे आणि मंगा स्पर्धा (डब्ल्यूएएम!) हा एक अत्यंत अनोखा उपक्रम असून सर्जकांना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्यासाठी मंच उपलब्ध करून देऊन ॲनिमेशन आणि कॉमिक्स संदर्भात भारतातील वाढत्या रुचीचा उपयोग करून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय माध्यमे आणि मनोरंजन संघटनेच्या (एमईएआय) सहकार्याने आयोजित केलेल्या या डब्ल्यूएएम! उपक्रमामुळे जपानी शैलीतील लोकप्रिय कलाकृतींची भारतीय तसेच जागतिक अशा दोन्ही पातळीवरील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी स्थानिक रुपांतरे विकसित करण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. प्रकाशन, वितरण आणि उद्योगांमध्ये प्रवेशाच्या संधींसह ही स्पर्धा कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देते आणि उदयोन्मुख प्रतिभांची जोपासना करते. देशभरातील 11 शहरांमध्ये या स्पर्धेच्या  राज्यस्तरीय फेऱ्या  होणार असून मुंबई येथे वेव्हज 2025 ची  राष्ट्रीय महाफेरी पार पडेल.
डब्ल्यूएएम! हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज या जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) आधिपत्याखालील महत्त्वाच्या उपक्रमाचा भाग असून 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्हज हा माध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील चर्चा, सहयोग आणि नवोन्मेष यासाठीचा महत्त्वाचा मंच म्हणून कार्यरत असून हा कार्यक्रम नव्या संधींचा शोध घेऊन या क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी जागतिक भागधारकांना एकत्र आणत आहे. वेव्हजच्या केंद्रस्थानी असलेल्या क्रिएट इन इंडिया आव्हानासाठी जगभरातून 70,000 हून अधिक नोंदण्या झाल्या असून उदयोन्मुख प्रतिभांना जागतिक मंचावर त्यांच्या कार्याचे सादरीकरण करण्यासाठी सक्षम करत आहे. डब्ल्यूएएम! सह भारत पुन्हा कलात्मक परंपरांना समकालीन कथाकथन कलेशी जोडून घेऊन अॅनिमे आणि मांगा साठीचे चैतन्यमयी केंद्र म्हणून स्वतःला स्थापित करत आहे.

अनुलंब आणि श्रेणी

सहभाग अनुलंब

  • मंगा : पुरवण्यात आलेल्या पटकथेवर आधारित जपानी शैलीचे कॉमिक  तयार करणे.
  • वेबटून: पुरवण्यात आलेल्या पटकथेपासून डिजिटल विशिष्ट कॉमिक  तयार करणे.
  • अ‍ॅनिमे  : पुरवण्यात आलेल्या पटकथेवर आधारित जपानी शैलीतील अॅनिमेशन अनुक्रम तयार करणे

सहभागींच्या श्रेणी

  • वैयक्तिक(विद्यार्थी): कोणत्याही मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
  • संघ (विद्यार्थी): चार सदस्य असलेले विद्यार्थी संघ.
  • वैयक्तिक (व्यावसायिक): विद्यार्थी नसलेल्या सर्व व्यक्तींसाठी खुली
  • संघ (व्यावसायिक): विद्यार्थी नसलेल्या व्यक्तींचा चार सदस्यांचा संघ

 पात्रता निकष

  • निश्चित केलेल्या श्रेणींवर आधारित व्यक्ती आणि संघांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
  • मंगा आणि वेबटून: विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा दोन्ही श्रेणींमधून वैयक्तिक सहभागाला परवानगी
  • अ‍ॅनिमे : विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा दोन्ही श्रेणींसाठी संघ सहभागाला (4 सदस्यांपर्यंत) परवानगी
  • सहभागी विद्यार्थी शाळा अथवा पदवीपूर्व महाविद्यालयात प्रवेश घेतलेले असावेत(वय वर्ष 21 पर्यंतचे). इतरांना व्यावसायिक श्रेणीत नोंदणी करावी लागेल.

 स्पर्धांचे वेळापत्रक

Date

City

Venue

Registration

22nd November, 2024

Guwahati

NEDFi Convention Centre

Closed

24th November, 2024

Kolkata

Heritage School

Closed

26th November, 2024

Bhubaneswar

Sri Sri University

Closed

28th November, 2024

Varanasi

Sunbeam Suncity School

Closed

30th November, 2024

Delhi

IIMC, Vasant Kunj

Closed

TBD

Bengaluru

TBD

Click Here

TBD

Mumbai

TBD

Click Here

TBD

Ahmedabad

TBD

Click Here

TBD

Nagpur

TBD

Click Here

TBD

Hyderabad

TBD

Click Here

TBD

Chennai

TBD

Click Here

1st – 4th May, 2025

Finale

Jio World Convention Centre & Jio World Gardens

State Level Winners

 


सहभागासाठी मार्गदर्शक तत्त्वे:
o सर्व श्रेणींसाठी स्क्रिप्ट्स जागेवरच/ऑनस्पॉट प्रदान केल्या जातील.
o फक्त मंगा श्रेणीतील सबमिशन भौतिक स्वरूपात असू शकतात. इतर सर्व श्रेणींमध्ये डिजिटल सबमिशन आवश्यक आहेत.
o  सहभागींनी त्यांचे काम निर्दिष्ट वेळेत आणि स्वरूपात तयार करून सबमिट करावे:
o मंगा (विद्यार्थी आणि व्यावसायिक): 2 पाने, प्रत्येकी किमान 4 पॅनेल, शाई आणि रंग (भौतिक-फिजिकल/डिजिटल).
o वेबटून (विद्यार्थी): शाई आणि रंग असलेले 7 पॅनेल.
o वेबटून (व्यावसायिक): शाई आणि रंग असलेले 10 पॅनेल.
o अ‍ॅनिमे (विद्यार्थी): दिलेल्या स्क्रिप्टवर आधारित 10 सेकंदांचे अ‍ॅनिमेशन.
o अ‍ॅनिमे (व्यावसायिक): दिलेल्या स्क्रिप्टवर आधारित 15 सेकंदांचे अ‍ॅनिमेशन.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि बक्षिसे
• सर्व स्पर्धा ऑफलाइन होतील; सहभागींनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
 • नोंदणी सकाळी 9:00 वाजता सुरू होइल, त्यानंतर सकाळी 9:30 वाजता डीब्रीफिंग होईल.
 • ही स्पर्धा सकाळी 10: 00 ते सायंकाळी 6: 00 वाजेपर्यंत होईल.
• त्याच दिवशी संध्याकाळी 6:00 ते 8:0 वाजेपर्यंत कॉस्प्ले स्पर्धा आणि इतर सादरीकरणे आयोजित केली जातील.
• WAM! चा अंतिम सामना 1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स, मुंबई येथे होणाऱ्या वेव्ह्ज शिखर परिषदेत  होईल.

• विजेत्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मदतीने अ‍ॅनिमे जपान आणि इतर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना सर्व खर्चासह सहलीची सुविधा मिळेल.

वॅम! कॉस्प्ले स्पर्धा

WAM! कॉस्प्ले स्पर्धा ही विद्यार्थी, कर्मचारी आणि बाह्य सहभागींसह व्यक्तींसाठी खुली आहे, त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. सर्जनशीलता आणि मौलिकतेला प्रोत्साहन असे कॉस्प्ले हे अ‍ॅनिमे, मंगा, गेमिंग किंवा भारतीय कॉमिक्समधील पात्रांवर आधारित असले पाहिजेत. पोशाख आणि प्रॉप्स हे स्वतः बनवलेले असावेत, कारागिरीवर कोणतेही बंधन नसावे, परंतु प्रॉप्स आणि शस्त्रे प्रातिनिधिक असावीत आणि कार्यक्रमापूर्वी तपासणी दरम्यान त्यांची तपासणी करून घ्यावी.

सहभागींनी शिस्त राखली पाहिजे, कोणत्याही आक्षेपार्ह वर्तनामुळे अपात्र ठरविण्यात येऊ शकते. पोशाखाची अचूकता, कारागिरी, कामगिरी, सर्जनशीलता, प्रेक्षकांच्या,  सहभाग आणि सहभागी त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल किंवा पोशाखाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील असा संवाद, या सर्वांवर आधारित निर्णय घेतला जाईल. प्रत्येक कलाकाराला सादरीकरणासाठी 90 सेकंद आणि परिचय आणि संवादासाठी 1 मिनिटाचा वेळ असेल, ज्यामध्ये परीक्षकांचे निर्णय अंतिम असतील. पहिल्या तीन कॉस्प्लेयरना  रोख बक्षिसे मिळतील आणि सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्रे दिली जातील.

संदर्भ:

S.Kakade/S.Chitnis/H.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

(Release ID: 2104238) Visitor Counter : 23