पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित
Posted On:
12 FEB 2025 12:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. .
आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी भारत-फ्रान्स दरम्यान व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला त्यातून मिळालेली चालना यांचा उल्लेख केला. स्थिर सरकार आणि अपेक्षित धोरणात्मक परिसंस्थेच्या आधारावर भारत जागतिक गुंतवणुकीचे पसंतीचे ठिकाण बनल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या सुधारणांबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी नमूद केले की विमा क्षेत्र आता 100% थेट परदेशी गुंतवणुकीसाठी आणि एसएमआर आणि एएमआर तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून नागरी अणुऊर्जा क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले करण्यात आले आहे; सीमाशुल्क दर रचनेचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे ,जीवन सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी सुलभ प्राप्तिकर संहिता आणली आहे. सुधारणा सुरू ठेवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेसंदर्भात त्यांनी नमूद केले की विश्वासावर आधारित आर्थिक शासन व्यवस्था स्थापित करण्यासाठी नियामक सुधारणांसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याच बरोबर , गेल्या काही वर्षांमध्ये 40,000 हून अधिक अनुपालन तर्कसंगत करण्यात आले आहेत.
संरक्षण , ऊर्जा, महामार्ग, नागरी विमान वाहतूक, अंतराळ, आरोग्यसेवा, फिनटेक आणि शाश्वत विकास क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय यश मिळवले असून त्यातून निर्माण झालेल्या अफाट संधी पाहण्यासाठी पंतप्रधानांनी फ्रेंच कंपन्यांना आमंत्रित केले. भारताची कौशल्ये, प्रतिभा आणि नवोन्मेष तसेच अलिकडेच सुरु करण्यात आलेले एआय , सेमीकंडक्टर, क्वांटम, महत्वपूर्ण खनिजे आणि हायड्रोजन मिशनची जगभरात झालेली प्रशंसा आणि त्याबाबत स्वारस्य अधोरेखित करून, त्यांनी फ्रेंच उद्योगांना परस्पर विकास आणि समृद्धीसाठी भारताबरोबर भागीदारी करण्याचे आवाहन केले. नवोन्मेष, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान-प्रणित भागीदारीला चालना देण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत या क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांचे संपूर्ण संबोधन येथे पाहता येईल
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह फ्रान्सचे युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन-नोएल बॅरोट, आणि फ्रान्सचे अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्री एरिक लोम्बार्ड यांनीही सीईओ मंचाला संबोधित केले.
दोन्ही बाजूंचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हा तपशील पुढील प्रमाणे.
भारतीय पक्ष
क्रं
|
कंपनीचे नाव क्षेत्र
|
अधिकाऱ्याचे नाव व पद
|
1
|
जुबिलियंट फूडस् वर्क्स/ जुबिलियंट लाईफ सायन्सेस फूड अँड बिवरेजेस
|
हरी भरतिया
सह-अध्यक्ष आणि संचालक
|
2
|
सीआयआय
|
चंद्रजित बॅनर्जी
महासंचालक
|
3
|
तितागढ रेल सिस्टिम्स लिमिटेड, रेल्वे आणि पायाभूत सुविधा
|
उमेश चौधरी
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
|
4
|
भारत लाईट अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड
(नवीकरणीय ऊर्जा)
|
तेजप्रीत चोप्रा
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
5
|
पी मफतलाल ग्रुप
वस्त्रोद्योग आणि औद्योगिक उत्पादने
|
विशाद मफतलाल
अध्यक्ष
|
6
|
बॉट
ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स (वेअरेबल्स)
|
अमन गुप्ता
सहसंस्थापक
|
7
|
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की)
व्यवसाय समर्थन आणि समावेशन
|
मिलिंद कांबळे
संस्थापक /अध्यक्ष
|
8
|
स्कायरूट एअरोस्पेस
एअरोस्पेस, अंतराळ आणि तंत्रज्ञान
|
पवन कुमार चंदाना
सह संस्थापक
|
9
|
अग्नीकुल
एअरोस्पेस, अंतराळ आणि तंत्रज्ञान
|
श्रीनाथ रविचंद्रन
सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
10
|
टाटा ॲडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेड,
एअरोस्पेस आणि संरक्षण
|
सुकरण सिंग
व्यवस्थापकीय संचालक
|
11
|
यूपीएल ग्रुप
कृषीरसायने आणि कृषीव्यवसाय
|
विक्रम श्रॉफ
उपाध्यक्ष आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी
|
12
|
सुला वाईनयार्डस
खाद्यपदार्थ आणि पेय
|
राजीव सामंत
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
13
|
डायनामिक टेक्नॉलॉजी लिमिटेड,
एरोस्पेस आणि संरक्षण तसेच अभियांत्रिकी
|
उदयंत मल्होत्रा
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक
|
14
|
टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स (TCE)
|
अमित शर्मा
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
15
|
नायका
सौंदर्य प्रसाधने आणि ग्राहकोपयोगी वस्तू
|
फाल्गुनी नय्यर
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
फ्रेंच पक्ष
1
|
एअरबस
एरोस्पेस आणि संरक्षण
|
गुईलेम फरे
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
2
|
एअर लिक्विड
रसायने , आरोग्यनिगा आणि तंत्रज्ञान
|
फ्रांकॉईज जॅको
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर लिक्विड ग्रुपच्या संचालक मंडळाचे सदस्य
|
3
|
ब्ला ब्ला कार
वाहतूक आणि सेवा
|
निकोलस ब्रुसन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक
|
4
|
कॅपजेमिनी ग्रुप,
माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी
|
ऐयमान इज्जात
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
5
|
डॅनॉन
खाद्यपदार्थ आणि पेय
|
अँटोनी दी सेंट आफ्रिकेई
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
6
|
इ डी एफ
ऊर्जा आणि विद्युत
|
लक रैमांट
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
7
|
एजिस ग्रुप
स्थापत्यशास्त्र आणि स्थापत्य अभियांत्रिकी
|
लॉरेंट जर्मेन, सीईओ
|
8
|
एन्जी ग्रुप, ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा
|
कॅथेरीन मॅकग्रेकर
मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी आणि एन्जि संचालक मंडळाचे सदस्य
|
9
|
लॉरेएल
सौंदर्यप्रसाधने आणि ग्राहकोपयोगी वस्तू
|
निकोलस हेरोनिमस
मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ सदस्य
|
10
|
मिस्ट्राल एआय
कृत्रिम बुद्धिमत्ता
|
आर्थर मेंश
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक
|
11
|
नेवल ग्रुप
संरक्षण, जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी
|
पियरे एरिक्स पोम्प्लेट
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
12
|
पर्नॉर्ड रिचर्ड
अल्कोहोल पेय, एफ एम सी जी वस्तू
|
अलेक्झांड्रे रिकार्ड
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
13
|
सफ्रान
एरोस्पेस आणि संरक्षण
|
ऑलिव्हर ऍड्रीस
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
14
|
सर्विअर
औषधे व आरोग्यनिगा
|
ऑलिवीअर लॉरे
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
14
|
टोटल एनर्जीज एसइ
ऊर्जा
|
पॅट्रिक प्योने
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
15
|
विकॅट
बांधकाम
|
गाय सिडोस
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
|
***
JPS/SonalT/SK/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102162)
Visitor Counter : 41
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu