माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज (WAVES) एआय आर्ट इन्स्टॉलेशन चॅलेंज स्पर्धा
Posted On:
10 FEB 2025 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025
सर्जनशीलता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या अभिनव मिलाफाच्या नव्या युगाचा प्रारंभ
एआय आर्ट इन्स्टॉलेशन चॅलेंज या स्पर्धेविषयी
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संयुक्तपणे एआय आर्ट इन्स्टॉलेशन चॅलेंज अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत कलाकृती निर्मिती स्पर्धा या अत्यंत अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मिलाफातून निर्माण होणाऱ्या अभिव्यक्तीचा अनुभव घेता यावा यासाठी सर्व कलाकार, डिझायनर तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची आवड असलेल्या सगळ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक ज्यामुळे सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या सर्व सीमा ओलांडत, कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक साधने आणि तंत्राचा वापर करून आपली विशिष्ट छाप सोडणाऱ्या आणि कलेच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या कलाकृती तयार करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची कला क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवणे तसेच समांतरपणे गुंतवणूकदार, सहकार्यपूर्ण भागिदार आणि या उद्योगक्षेत्रातील तज्ञांना परस्परांसोबत जोडून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा आणखी एक महत्वाचा उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कला आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ घडून येणार असून, त्याद्वारे ही स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत सर्जनशील अभिव्यक्तिच्या क्षेत्रात भारताला आघाडीचे स्थानही मिळवून देणार आहे.

ही स्पर्धा भारतात होणार असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज (WAVES - World Audio Visual & Entertainment Summit) या शिखर परिषदेच्या प्रचार प्रसाराच्या अनुषंगाने राबवल्या जात असलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस या उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित केली गेली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नेतृत्वात होत असलेल्या या उपक्रमासाठी आत्तापर्यंत तब्बल 70,000 पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आतापर्यंत नवोन्मेष आणि जागतिक पातळीवरील सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या एकूण 31 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी आघाडीचे व्यासपीठ ठरलेली WAVES ही शिखर परिषद, परस्पर सहकार्य, व्यापार विषयक संधी आणि सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःचे स्थान बळकट करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ देणारे व्यासपीठच ठरू लागले आहे. याच वर्षी 1 मे ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स इथे ही शिखर परिषद आयोजित केली जाणार असून, ही परिषद म्हणजे अभिनव कल्पना आणि उदयोन्मुख प्रतिभांना जगासमोर आणणारे व्यासपीठच ठरणार आहे.
पात्रतेसाठी मार्गदर्शक तत्वे

प्रवेशिका सादर करण्यासंबंधीच्या अटी आणि शर्ती
- स्पर्धकांनी आपल्या कलाकृतीची व्यवहार्यता आणि कलेच्या माध्यमातून संवाद साधण्याची क्षमता दाखवणारा संकल्प आराखडा (prototype) अथवा प्रतिकृती (mockup) सादर करावी
- प्रकल्पासंबंधीच्या क्रिया प्रक्रिया, कलाकृतीमागची प्रेरणा आणि उपयोगात आणलेले कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक तंत्र याविषयी माहिती सादर करावी.
- रेखाचित्रे (स्केचेस) किंवा त्रिमिती प्रारुपासारखे (3D model) दृश्य स्वरूपातील सादरीकरण सादर करावे.
- स्पर्धकांनी आपल्या कलाकृतीविषयीची संकल्पना स्पष्ट करणारा तसेच संकल्प आराखडा (prototype) किंवा संगणकीय प्रतिरुपण (simulation) दाखवणारी जास्तीत जास्त 5 मिनिटे कालावधीची छोटी चित्रफित अपलोड करावी.
- स्पर्धेसाठी नोंदणी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 15 मार्च 2025.
मूल्यांकनाचे निकष

अपात्रतेविषयीचे नियम
- साहित्याची चोरी किंवा अनधिकृत साहित्याचा वापर
- कलाकृती सादर करण्याच्या तसेच पात्रता निकषांच्या नियमांचे उल्लंघन
संदर्भ
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101548)
Visitor Counter : 29