महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामाजिक विकास आयोगाच्या अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये होणाऱ्या यंदाच्या 63 व्या सत्रात महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधी मंडळ होणार सहभागी

Posted On: 10 FEB 2025 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025

 

सामाजिक विकास आयोगाच्या (सीएसओसीडी) अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणाऱ्या 63 व्या सत्रात भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधिमंडळ सहभागी होणार आहे. समावेशी सामाजिक धोरणे राबवत जागतिक स्तरावर सामाजिक कल्याणाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून महत्वाच्या सामाजिक विकास मुद्द्यांवर चर्चा आणि भागीदारी वाढवण्याचा सामाजिक विकास आयोगाच्या या सत्राचा उद्देश आहे. 

या सत्रादरम्यान, भारत प्रमुख चर्चासत्रांमध्ये सक्रियपणे सहभागी होईल. मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी "ऐक्यभाव आणि सामाजिक एकता मजबूत करणे" या प्राधान्य संकल्पनेवरील मंत्रीस्तरीय बैठकीत राज्यमंत्री सावित्री ठाकूर भारताचे निवेदन सादर करतील.

भारतीय प्रतिनिधीमंडळ "वरचेवर उद्भवणाऱ्या आणि जटील समस्यांच्या संदर्भात सामाजिक लवचिकता वाढविण्यासाठी धोरणे" यासारख्या उदयोन्मुख मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चेत देखील योगदान देईल आणि सार्वत्रिक हक्क-आधारित सामाजिक संरक्षण प्रणालींवरील चर्चेत देखील सहभागी होईल.

या बैठकीत भारतीय प्रतिनिधीमंडळ सामाजिक लवचिकता बळकट करण्यासाठीच्या धोरणांवर आणि उपक्रमांवर प्रकाश टाकेल.

सामाजिक विकास आयोगाच्या या सत्रादरम्यान होणाऱ्या चर्चेतून सामाजिक दुर्बलता  दूर करण्यासाठी आणि संकटांना तोंड देताना लवचिकता सुधारण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. मजबूत, अधिक लवचिक समाजाच्या उभारणीत आपले अनुभव सामायिक करण्यासाठी आणि जागतिक साथीदारांकडून शिकण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2101415) Visitor Counter : 43