मंत्रिमंडळ
विशाखापट्टणम येथील प्रस्तावित दक्षिण तटीय रेल्वे (एससीओआर) झोन अंतर्गत विभागीय अधिकारक्षेत्रात सुधारणा करून वॉल्टेअर विभाग विभाजित स्वरूपात कायम ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
07 FEB 2025 8:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज खालील बाबींना कार्योत्तर मान्यता दिली:
i केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 28.02.2019 च्या पूर्वीच्या निर्णयात आंशिक सुधारणा करून वॉल्टेअर विभाग विभाजित स्वरूपात कायम ठेवला असून त्याचे नाव विशाखापट्टणम विभाग असे ठेवले आहे.
ii त्यामुळे आता , वॉल्टेअर विभागाच्या एका भागात, पलासा-विशाखापट्टणम- दुव्वाडा, कुनेरू-विजयनगरम, नौपाडा जंक्शन-परलाखेमुंडी, बॉबिली जंक्शन – सालूर, सिंहाचलम उत्तर – दुव्वाडा बायपास, वडालापुडी – दुव्वाडा आणि विशाखापट्टणम स्टील प्लांट – जगगयापलेम (सुमारे 410 किमी), या स्थानकांमधील विभागांचा समावेश होऊन ते नवीन दक्षिण तटीय रेल्वे अंतर्गत वॉल्टेअर विभाग म्हणून कायम ठेवले जातील. त्याचे नामकरण विशाखापट्टणम विभाग असे केले जाईल कारण वॉल्टेअर हे नाव वसाहतवादी वारशाचे प्रतीक असून ते बदलणे क्रमप्राप्त आहे.
iii वॉल्टेअर विभागाच्या दुसऱ्या भागात, कोट्टावलासा – बचेली, कुनेरू – थेरुवली जंक्शन, सिंगापूर रोड कोरापुट जंक्शन आणि परलाखेमुंडी – गुनपूर (सुमारे 680 किमी), या स्थानकांमधील साधारणपणे विभागांचा समावेश आहे. - हा भाग पूर्व तटीय रेल्वेअंतर्गत नवीन विभागात रूपांतरित केला जाईल, त्याचे मुख्यालय रायगडा येथे असेल.
वॉल्टेअर विभाग त्याच्या विभाजित स्वरूपातही कायम ठेवल्याने या भागातील लोकांची मागणी आणि आकांक्षा पूर्ण होतील.
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2100919)
Visitor Counter : 16