पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला 5 फेब्रुवारी रोजी देणार भेट
पंतप्रधान संगमवर पवित्र स्नान करून गंगामातेची पूजा करतील
Posted On:
04 FEB 2025 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी 2025 रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळा-2025 ला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते संगमावर पवित्र स्नान करून गंगा मातेची पूजाअर्चना करतील.
महाकुंभ 2025, पौष पौर्णिमेपासून (13 जानेवारी 2025) सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा आहे. संपूर्ण जगभरातून लाखो भाविक यासाठी येत असून महाकुंभ 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी पंतप्रधानांनी नेहमीच महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तीर्थस्थळी पायाभूत सुविधा आणि सेवांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याआधी, 13 डिसेंबर 2024 रोजी प्रयागराज दौऱ्यात, पंतप्रधानांनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामुळे संपर्क सुविधा, सोयीसुविधा आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.
* * *
S.Kakade/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2099817)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam