अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवामान बदलाची अनुकुलता, मागणीला अनुकूल धोरणात्मक सुधारणा व पुरेसे निधीपुरवठा पर्याय विकसित करणे: आर्थिक सर्वेक्षण 2024-25


2070 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन: मोठ्या प्रमाणात ग्रीड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व महत्वाच्या खनिजांच्या सुरक्षित पुरवठा स्रोतांची जुळवाजुळव

आर्थिक सर्वेंक्षणात ऊर्जा संवर्धन व शाश्वत इमारत बांधणी संहितेत ECSBC अधिक सुधारणा सुचवल्या असून त्यामध्ये शहरी भागातील भिंतीवरील बागांसारख्या उपक्रमांसाठी मार्गदर्शक नियमांचा समावेश आहे.

सर्वसमावेशक जनजागृती मोहीम राबवून मिशन लाईफ चे रूपांतर जन चळवळीत करण्याची गरज : आर्थिक सर्वेक्षण 2024-25

Posted On: 31 JAN 2025 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2025

 

भारताची विकसित भारत 2047 कडे चाललेल्या महत्वाकांक्षी वाटचालीत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाचा मोठा सहभाग आहे. केंद्रीय वित्त व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये याचे प्रतिबिंब दिसते. 

भारतातील दरडोई कार्बन उत्सर्जन अतिशय कमी असूनही देश विकासाच्या मार्गावर चालला असून यामुळे परवडण्यायोग्य दरात ऊर्जा सुरक्षा, रोजगार निर्मिती, आर्थिक प्रगती साधत तर आहेच शिवाय शाश्वत पर्यावरण संवर्धन देखील साध्य होत असल्याचे  या सर्वेक्षणात म्हटले आहे. 

2070 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन

2070 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात ग्रिड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व महत्वाच्या खनिजांच्या सुरक्षित पुरवठा स्रोतांची जुळवाजुळव करण्यास प्राथमिकता द्यावी लागेल, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. 

अनुकूलन (जुळवून घेण्याच्या) धोरणाला प्राथमिकता

भारतातील क्षेत्रीय विशिष्ट गरजांना अनुकूल असे बहुआयामी धोरण राबवण्याची गरज आर्थिक सर्वेक्षणात अधोरेखित केली आहे. वेगवान शहरीकरणामुळे शहरी भागातील तापमानवाढ, कार्बन उत्सर्जन व वायू प्रदूषणात होत असलेल्या वाढीला अटकाव करण्यासाठी उभ्या बागा  अथवा भिंतीवरील बागा (VGS) निर्माण करण्याच्या सूचना आर्थिक सर्वेक्षणात दिल्या आहेत . 

ऊर्जा संक्रमण

ऊर्जा संक्रमण व ऊर्जा सुरक्षा या दोन संकल्पनांमधील संघर्ष विकसित देशांच्या कृतीतून दिसून येत असून वायू व सौर ऊर्जा वापरातील मर्यादा लक्षात येत असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नोंदवले आहे. 

या संबंधात भारताच्या शाश्वत विकासाच्या मार्गावरील औष्णिक ऊर्जेचे महत्व आर्थिक सर्वेक्षणात लक्षात घेतले असून कोळशाचा कार्यक्षम वापर करून कार्बन उत्सर्जन कमी पातळीवर ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले आहे. 

अणुऊर्जा : एक विश्वसनीय पर्याय 

अणुऊर्जा हा कार्यक्षम व कमीतकमी हरितगृह वायू उत्सर्जन करणारा ऊर्जास्रोत असून जीवाष्म इंधनाला एक विश्वसनीय पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. 

राष्ट्रीय निश्चित योगदानाच्या (NDC) उद्दिष्टांकडे  भारताची वाटचाल सुरु आहे. जीवाश्मेतर इंधनाच्या स्रोतांमधून झालेली 2,13,701 मेगॅवॅट्स वीज निर्मिती ही एकूण वीजनिर्मिती क्षमतेच्या 46.8% एवढी असून  राष्ट्रीय निश्चित योगदानामधील सुधारित  50% च्या उद्धिष्टाकडे 2030 पर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिने ही वाटचाल योग्य असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.  राष्ट्रीय निश्चित योगदानातील 2.5 ते 3 बिलियन टन कार्बन डाय ऑक्साईड शोषून कमी करण्याच्या कार्बन सिंक प्रक्रियेतील 2.29 बिलियन कार्बन डाय ऑक्साईड शोषण्यासाठी एक यंत्रणा 2005 ते 2023 दरम्यान तयार केली गेली असल्याचे सर्वेक्षणात नोंदवले आहे. 

  

भारताची (इंधनाविषयीची) स्थापित उत्पादन क्षमता (30 नोव्हे 2024)

   

मिशन लाईफ : Mission  LiFE : शाश्वत विकासासाठी अनुरूप जीवनशैली 

सर्व उत्पादनांचा सजग वापर करून कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी मानसिकतेत व वर्तनात मोठा बदल घडवण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये दर्शवली आहे. कचरा व्यवस्थापन, सर्व स्रोतांचे संवर्धन व पुनर्वापर अशा  पर्यावरणस्नेही जीवनशैली द्वारे देशाच्या शाश्वत विकास प्रयत्नांना पाठबळ देणे हे Mission LiFE चे उद्दिष्ट आहे. 

पर्यावरणासाठी एकत्रित कृती ची शक्ती

चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन हे मिशन लाईफ चे मध्यवर्ती सूत्र आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीला अनुरूप असे अनेक उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. उदाहरणार्थ, ग्रीन क्रेडिट नियम हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल  आहे. ‘एक पेड मां के नाम’ हा वृक्षारोपणाचा उपक्रम देखील महत्वाचा आहे. यातून प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. स्वच्छ भारत मिशन देखील सार्वत्रिक स्वच्छतेच्या उपलब्धतेसाठी भारताच्या प्रयत्नातील महत्वाचा उपक्रम आहे. 

 

* * *

NM/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2098278) Visitor Counter : 13