पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियान देशाच्या आयात अवलंबित्वात कपात करण्यास तसेच देशांतर्गत मूल्यसाखळीला बळकटी देण्यास आणि भारताच्या 'नेट झिरो बाय 2070' या उद्दिष्टास पाठबळ देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2025 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियान हे देशाच्या आयात अवलंबित्वात कपात करण्यास, देशांतर्गत मूल्यसाखळी मजबूत करण्यास आणि भारताच्या 'नेट झिरो बाय 2070' या उद्दिष्टास पाठबळ देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल.
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियान (एनसीएमएम) या विषयावर लिहिलेल्या लेखाला प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
"केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी विस्तृतपणे स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियान देशाच्या आयात अवलंबित्वात कपात करेल, देशांतर्गत मूल्यसाखळी अधिक बळकट करेल आणि भारताच्या 'नेट झिरो बाय 2070' या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल."
* * *
JPS/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2097641)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada