माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ 2025: मौनी अमावस्येच्या दिवशी भक्तगणांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी मेळा प्रशासन आणि पोलिसांनी केली विशेष तयारी

Posted On: 28 JAN 2025 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025


महाकुंभ 2025 मध्ये मौनी अमावस्येच्या पवित्र प्रसंगी  लाखो भक्तगण प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. त्यांची सुरक्षितता आणि सोयीसाठी मेळा प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.आपत्कालीन परिस्थितीत, भक्तगणांच्या मदतीसाठी मेळा पोलिस, वाहतूक पोलिस आणि विशेष डॉक्टरांची पथके 24/7 तैनात करण्यात आली आहेत.

महाकुंभ नगर येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या अमृतस्नानासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषत: भक्तगणांना सतर्क राहण्यासाठी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि काही अडचण आल्यास पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भक्तगणांच्या मदतीसाठी पोलीस आणि प्रशासन चोवीस तास सज्ज आहेत.

गर्दीचे व्यवस्थापन:

काय करावे :

  • संगम घाटावर जाण्यासाठी नेमून दिलेल्या मार्गांचा वापर करा.
  • गंगा स्नानाला जाताना तुमच्या रांगेतच   रहा.
  • स्नान आणि दर्शन केल्यानंतर थेट पार्किंग क्षेत्राकडे जा.
  • मंदिरांना भेट देताना, तुमच्या रांगेतच रहा आणि तुमच्या गंतव्यस्थानाकडे जा.
  • आवश्यक असेल तिथे पोलिसांची मदत घ्या.
  • आरोग्य समस्या असल्यास, जवळच्या क्षेत्रीय रुग्णालयात  तपासणी करा.
  • बॅरिकेड्स आणि तरंगत्या  पुलांवर संयम बाळगा ,उतावीळपणा टाळा.
  • कागद, ताग किंवा पर्यावरणपूरक भांडी आणि कुल्हड (मातीचे कप) वापरा.
  • सर्व घाट हे संगमाचा भाग आहेत; तुम्ही पोहोचाल तिथल्या घाटावर स्नान करा.

काय करू नये:

  • भक्तगणांनी मोठ्या समुहाने कोणत्याही एका ठिकाणी थांबू नये.
  • येताना किंवा निघताना भक्तांनी समोरासमोर भेटणे टाळा.
  • मेळ्यात पसरवल्या जात असलेल्या अफवांना बळी पडू नका.
  • सोशल मीडियावरून पसरवलेल्या कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
  • मंदिरांना भेट देताना घाई करू नका.
  • परिसरात गर्दी होऊ नये  यासाठी  पथांवर थांबणे टाळा; कोणतेही मार्ग अडवू नका.
  • व्यवस्था किंवा सेवांबाबत दिशाभूल करणाऱ्या सूचनांना बळी पडू नका.
  • दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणे टाळा.
  • पवित्र स्नानासाठी घाई करू नका.
  • प्लास्टिक पिशव्या आणि भांडी वापरणे टाळा.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2097182) Visitor Counter : 32