गृह मंत्रालय
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पवित्र त्रिवेणी संगमात केले स्नान
संगम किनाऱ्यावर कुटुंबासह पूजा करून देशवासियांच्या समृद्धी तसेच प्रगतीसाठी केली प्रार्थना
Posted On:
27 JAN 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले.
या संदर्भामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यम ‘एक्स’ वर प्रसिध्द केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सामाजिक सौहार्द आणि सद्भावनेचे प्रतीक असलेल्या पवित्र त्रिवेणी संगमात पूज्य संतांच्या उपस्थितीत स्नान केल्यानंतर आपण भारावून गेलो आहोत. यावेळी सर्वांच्या कल्याणासाठी गंगामाता, यमुनामाता आणि सरस्वतीमाता यांची प्रार्थना केली.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, महाकुंभामुळे देशवासीयांमध्ये सनातन परंपरांबद्दल एकता आणि अभिमानाची भावना वृध्दिंगत होत आहे. त्यांनी संगम तीरावर कुटुंबासह पूजा केली आणि देशवासियांच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.
यावेळी अमित शाह म्हणाले की, 'महाकुंभ' सनातन संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचे एक अद्वितीय प्रतीक आहे. कुंभ हा सुसंवादावर आधारित आपल्या सनातन जीवनाचे तत्वज्ञान प्रतिबिंबित करतो. ते म्हणाले की, संपूर्ण जगाला समता आणि सौहार्दाचा संदेश देणा-या सनातन धर्माचा भव्य मेळावा महाकुंभ हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर देशामधील विविधता, श्रद्धा आणि ज्ञान परंपरेचा संगम आहे.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2096859)