पंतप्रधान कार्यालय
2025 या वर्षाच्या सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2025 9:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2025 या वर्षाच्या सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्तिमत्व हे कठोर परिश्रम, ध्यास आणि नाविन्यतेचे प्रतीक आहेत, त्यांच्यामुळे असंख्य लोकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम घडून आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
पद्म पुरस्कार विजेत्यां सर्वांचे अभिनंदन! या सगळ्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा गौरव करताना आणि उत्सव साजरा करताना भारताला अभिमान वाटतो आहे. या सगळ्यांची निष्ठा आणि चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे. पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्तिमत्व हे कठोर परिश्रम, ध्यास आणि नाविन्यतेचे प्रतीक आहेत, त्यांच्यामुळे असंख्य लोकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम घडून आला आहे. या प्रत्येकाकडून आपल्याला उत्कृष्टतेसाठी झटत राहणे आणि नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करणे या मूल्यांची शिकवण मिळते.
https://www.padmaawards.gov.in/Document/pdf/notifications/PadmaAwards/2025.pdf”
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2096320)
आगंतुक पटल : 119
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu