पंतप्रधान कार्यालय
आज, राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, आम्ही मुलींना सक्षम बनवण्याच्या आणि त्यांच्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2025 8:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
X वरील एका थ्रेड पोस्टमध्ये, मोदी यांनी लिहिले की :
“आज, राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, आम्ही मुलींना सक्षम बनवण्याच्या आणि त्यांच्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. सर्व क्षेत्रात मुलींनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा भारताला अभिमान आहे. त्यांची कामगिरी आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहो. ” “आमच्या सरकारने शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे ज्यांचे मुलींच्या सक्षमीकरणात मोठे योगदान आहे. मुलींसोबत कोणताही भेदभाव होणार नाही यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत.”
***
SushamaK/HemangiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2095704)
आगंतुक पटल : 99
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam