गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मूतील राजौरी जिल्ह्यात झालेल्या मृत्यूंची कारणे शोधण्यासाठी आंतर मंत्रालयीन पथकाची स्थापना करण्याचे दिले आदेश
Posted On:
18 JAN 2025 7:04PM by PIB Mumbai
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात गेल्या सहा आठवड्यात झालेल्या 3 घटनांमध्ये झालेल्या मृत्यूंची कारणे शोधण्यासाठी गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील आंतर-मंत्रालयीन पथकाची स्थापना करण्याचे आदेश केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. हे पथक बाधित गावाला भेट देईल. या पथकात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, कृषी मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय तसेच जल संसाधन मंत्रालयातील तज्ज्ञांचा समावेश असेल. त्याचबरोबर पशुसंवर्धन, अन्न सुरक्षा आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची मदत घेतली जाईल.
19 जानेवारी रोजी हे पथक रवाना होणार आहे. तात्काळ मदत देण्यासाठी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यासाठी हे पथक स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने काम करेल.
परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी आणि मृत्यूला कारणीभूत घटक शोधण्यासाठी देशातील काही नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांची सेवा मिळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
***
S.Kane/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2094125)
Visitor Counter : 30