पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे
भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे.
सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे
Posted On:
15 JAN 2025 9:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सेना दिनाप्रीत्यर्थ भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे. भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. “सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.” असे मोदी म्हणाले.
"दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे भारतीय सेना हे मूर्तिमंत प्रतीक आहे. आपल्या सीमांच्या रक्षणासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपल्या सैन्यदलाने मानवतावादी मदतकार्यात नेहमीच मोठा सहभाग नोंदवला आहे.”
“सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.पुढील काळातही आम्ही ते करत राहू. ”
***
JPS/UR/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092976)
Visitor Counter : 32
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam