माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथे आकाशवाणीची विशेष  एफएम वाहिनी 'कुंभवाणी' आणि 'कुंभ मंगल ध्वनी'चे  केले उद्घाटन


प्रयागराज येथील महाकुंभाच्या कालावधीत कुंभवाणी वाहिनी  कार्यक्रमाच्या  थेट समालोचनासह  आपल्या परंपरेचा देशासह जगभरात प्रसार करणार आणि भाविकांना महत्त्वाची माहिती देणार

Posted On: 10 JAN 2025 7:54PM by PIB Mumbai

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज प्रयागराज मधील सर्किट हाऊस येथे महाकुंभ 2025 ला समर्पित आकाशवाणीच्या ‘कुंभवाणी’ (103.5 मेगाहर्ट्झ) या विशेष एफएम वाहिनीचे उद्घाटन केले. या ऐतिहासिक प्रसंगी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे देखील दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी कुंभमंगल ध्वनीचेही उद्घाटन केले.

कुंभवाणी वाहिनी सुरू केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानले, आणि ते म्हणाले की, ही एफएम वाहिनी लोकप्रियतेची नवी शिखरे सर करेलच, पण त्याशिवाय महाकुंभाला अशा दुर्गम खेड्यांमध्ये घेऊन जाईल, जिथले लोक इच्छा असूनही कुंभमेळ्याच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीने संबोधित करताना आनंद व्यक्त केला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले, तसेच अत्यंत कमी कालावधीत ही खास एफएम वाहिनी सुरू करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.  

कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जे प्रयागराज येथे येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी कुंभवाणी वरील धावते समालोचन उपयोगी ठरेल. या ऐतिहासिक महाकुंभाचे वातावरण देशासह संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला ते उपयोगी ठरेल. प्रसार भारती, देशाच्या सार्वजनिक प्रसारण सेवेच्या या उपक्रमामुळे केवळ भारतातील श्रद्धेची ऐतिहासिक परंपरा पुढे जाणार नाही, तर भाविकांना आपल्या घरात बसून कुंभमेळ्यातील महत्त्वाची माहिती मिळेल, आणि तिथले सांस्कृतिक वातावरण अनुभवता येईल. 

कुंभवाणी

कुंभवाणी वाहिनी : परिचय व प्रसारण कालावधी

प्रसारण कालावधी : 10 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025

प्रसारणाची वेळ : सकाळी 5:55 ते रात्री 10:05

फ्रिक्वेन्सी: एफएम 103.5 मेगाहर्ट्ज

कुंभवाणी वरील विशेष कार्यक्रम:

थेट प्रसारण:

मुख्य स्नान विधींचे थेट प्रक्षेपण (1429 जानेवारी, 3 फेब्रुवारी).

कुंभमेळ्यातील उपक्रमांचे दैनंदिन लाईव्ह रिपोर्टिंग.

सांस्कृतिक वारशावर विशेष सादरीकरण:

'शिव महिमा' मालिकेचे प्रसारण.

भारतीय सांस्कृतिक वारशावर आधारित विशेष कार्यक्रम.

टॉक शो:

'नमस्कार प्रयागराज' (सकाळी 9:00-10:00).

'संगमाच्या तटावरून' (दुपारी 4:00-5:30)

विशेष आरोग्य समुपदेशन :

'हॅलो डॉक्टर' कार्यक्रमात स्टुडिओमधून डॉक्टरांचा थेट आरोग्य सल्ला.

कुंभ न्यूज :

प्रमुख वार्तापत्र: (सकाळी 8:40, दुपारी 2:30 आणि रात्री 8:30).

विशेष वार्तांकन:

राज्य सरकार आणि विविध विभागांतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे वार्तांकन.

युवक, महिला आणि परदेशी पाहुण्यांसाठी विशेष कार्यक्रम.

महत्त्वाच्या सूचना:

प्रवास, आरोग्य, स्वच्छता, हरवलेले आणि सापडलेले आणि काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती प्रसारित केली जाईल.

आकाशवाणीने नेहमीच सार्वजनिक प्रसारकाची विशेष भूमिका बजावली आहे आणि भारतीय सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचा पुरस्कार केला आहे. 2013 च्या कुंभमेळ्यात आणि 2019 च्या अर्धकुंभात कुंभवाणी वाहिनीने श्रोत्यांची मोठी पसंती मिळवली होती. या परंपरेला अनुसरूनमहाकुंभ 2025 साठी ही विशेष वाहिनी पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2091984) Visitor Counter : 31