सांस्कृतिक मंत्रालय
महाकुंभ 2025 मधील आरोग्य सेवा
वैद्यकीय सेवा आणि वचनबद्धतेची गाथा
Posted On:
08 JAN 2025 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025
प्रयागराजमधील थंडीने गारठलेल्या सकाळी, महाकुंभ नगर येथील मध्यवर्ती रुग्णालयातील हालचाली वातावरणातील यात्रेकरूंच्या सुरेल मंत्रोच्चाराशी सहज नाते जोडत होत्या. गजबजलेल्या या वातावरणात मध्यप्रदेशातील 55 वर्षीय भाविक रामेश्वर यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित झळकत होते.त्यांच्या छातीमधील वेदना आता थांबल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र त्रासामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले होते. आयसीयू तज्ज्ञांच्या तत्पर कारवाईमुळे आणि अत्याधुनिक सुविधांमुळे त्याचा जीव वाचला. महाकुंभ 2025 मधील दूरदर्शी आरोग्य व्यवस्थेबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
यंदाच्या महाकुंभ मध्ये केवळ आध्यात्मिक पुनरुज्जीवनच नव्हे, तर जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना अत्युत्तम वैद्यकीय सेवेचेही आश्वासन देण्यात आले आहे. चोख नियोजन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने, राज्य सरकारने या भव्य आध्यात्मिक मेळाव्याला आरोग्य आणि सुरक्षेचा दीपस्तंभ बनवले आहे.
नेत्रकुंभ (नेत्र मेळावा), हे महाकुंभामधील आरोग्यसेवेच्या प्रयत्नांचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे, जो दृष्टीदोषाचा सामना करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. 3,00,000 चष्मे वाटप आणि 5,00,000 ओपीडी आयोजित करणे, यासह दररोज 10,000 रुग्णांना सल्लामसलत, हे या कार्यक्रमाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. नेत्रकुंभात नेत्रदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
परेड ग्राउंड येथील मध्यवर्ती रुग्णालय गेले अनेक आठवडे कार्यरत असून, महाकुंभातील वैद्यकीय सेवांचा आधारस्तंभ ठरले आहे. उल्लेखनीय प्रगतीमध्ये ईसीजी सुविधा सुरू करणे आणि दररोज 100 पेक्षा जास्त चाचण्या करणारी सेंट्रल पॅथॉलॉजी लॅब याचा समावेश आहे. यात्रेकरूंना 50 पेक्षा जास्त विनामूल्य निदान चाचण्यांचा लाभ घेता येईल, ज्यामुळे सर्वसमावेशक काळजी सुनिश्चित होईल. अलीकडील कृत्रिम बुद्धीमत्ते वर आधारित तंत्रज्ञानामुळे भाषेचा अडसर दूर होईल, ज्यामुळे 22 प्रादेशिक आणि 19 आंतरराष्ट्रीय भाषा बोलणारे डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील संवाद सुलभ होईल.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी, प्रयागराज रेल्वे विभागाने प्रयागराज जंक्शन, नैनी आणि सुभेदारगंजसह प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय निरीक्षण कक्ष स्थापन केले आहेत. चोवीस तास कार्यरत असलेल्या या खोल्या ईसीजी मशिन, डिफिब्रिलेटर आणि ग्लुकोमीटर सारख्या आवश्यक वैद्यकीय साधनांनी सुसज्ज आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलविले जाईल, जेणेकरून वेळेवर आणि प्रभावी उपचार मिळतील. या निरीक्षण कक्षात शिफ्टमध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका आणि फार्मासिस्टची एक समर्पित टीम कार्यरत आहे.
भारतभरातील 240 डॉक्टरांची पडद्यामागून टीम महाकुंभाच्या आरोग्य व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहेत.
या प्रयत्नांमधून आशा पल्लवित करणाऱ्या कहाण्या समोर येत आहेत. फतेहपूरयेथील अजय कुमार आणि पूजा या दाम्पत्याने सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या आपल्या नवजात बालकाचे स्वागत केले.
महाकुंभ 2025 बरोबर, येथील वैद्यकीय सुविधांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार्या कार्यक्रमांमधील आरोग्यसेवेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. उत्तर प्रदेश सरकारचे 'निरोगी आणि सुरक्षित' महाकुंभाचे स्वप्न, हे केवळ आश्वासन नसून वास्तव आहे.
संदर्भ
माहिती आणि जनसंपर्क विभाग (डीपीआयआर), उत्तर प्रदेश सरकार.
https://x.com/KumbhNetra2025
Healing at the Maha Kumbh 2025
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091310)
Visitor Counter : 23