पंतप्रधान कार्यालय
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी कोस्टा यांचे अभिनंदन केले
दोन्ही नेत्यांनी भारत-युरोपियन युनियन यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली
भारत-युरोपियन युनियन यांच्यातील परस्पर हिताच्या मुक्त व्यापार कराराला लवकर मूर्त रुप देण्याची आवश्यकता अधोरेखित केली
Posted On:
07 JAN 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांना दूरध्वनी करून संवाद साधला.
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष कोस्टा यांचे अभिनंदन केले.
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात गेल्या दशकभरात झालेली उल्लेखनीय आणि भरीव प्रगती लक्षात घेता, दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, हरित ऊर्जा आणि डिजिटल स्पेस या क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भारत-युरोपियन युनियन यांच्यातील परस्पर हिताच्या मुक्त व्यापार कराराला लवकर मूर्त रुप देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
यापुढील भारत-ईयू शिखर परिषद भारतात होणार असून त्यासाठी दोघांच्या सोईची वेळ निश्चित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी मान्यता दर्शवली.
त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय केला. तसेच एकमेकांशी संपर्कात राहण्याचे मान्य केले.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091039)
Visitor Counter : 39
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam