पंतप्रधान कार्यालय
विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने पंतप्रधानांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2025 8:42PM by PIB Mumbai
पोस्ट केलेले: 03 जानेवारी 2025 8:42PM PIB दिल्ली द्वारे विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताची मान गौरवाने उंचावल्याबद्दल कोनेरू हंपी हिचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल निश्चय स्पष्टपणे दिसून येत होते असे नमूद केले .
‘एक्स’ वरील कोनेरू हम्पीच्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
“कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. ती एक क्रीडाजगतातील ‘आयकॉन’ आहे आणि महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे. तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल जिद्द स्पष्टपणे दिसून येते. तिने भारताची मान केवळ अभिमानाने उंचावली नाही नाही तर उत्कृष्टता म्हणजे काय असते, याची नव्याने व्याख्या केली आहे.”
***
S.Kane/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2090050)
आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam