पंतप्रधान कार्यालय
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2025 10:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत , तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. त्या महिला सक्षमीकरणाच्या दीपस्तंभ आहेत, तसेच त्या शिक्षण आणि समाजिक सुधारणेच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत. लोकांचे जीवनमान चांगले व्हावे यासाठी आम्ही काम करत असताना त्यांनी केलेले प्रयत्न आम्हाला प्रेरणा देत राहतील.
***
JPS/TP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089761)
आगंतुक पटल : 103
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam