पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध - पंतप्रधान

Posted On: 02 JAN 2025 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025

 

न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा  तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  

एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे:

"न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळावी."

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089680) Visitor Counter : 28