शिक्षण मंत्रालय
‘जम्मू काश्मीर एन्ड लडाख: थ्रू द एजेस’ या पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन होणार
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार
Posted On:
01 JAN 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मान्यवर लेखक, शिक्षणतज्ज्ञ, मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
‘जम्मू काश्मीर एन्ड लडाख: थ्रू द एजेस’ या पुस्तकात जम्मू काश्मीर आणि लडाखची कहाणी सांगण्यात आली आहे. हे पुस्तक जम्मू काश्मीर आणि लडाखच्या कथेचे एका दृष्टीकोनातून आणि स्वरूपातून दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न करते, जे या विषयातील तज्ञ आणि विषयाशी अधिक ओळख नसलेल्या वाचकांपर्यंत त्याचा आशय पोहोचवते. सात विभागांमध्ये हे पुस्तक सादर करण्यात आले असून, त्यामध्ये या प्रदेशाच्या तीन हजार वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे. पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक निवडली गेली असून, त्यामधून तो कालखंड, त्याचे महत्व आणि भारतीय इतिहासाच्या मोठ्या ऐतिहासिक काळातील त्याचे योगदान विशद करण्यात आले आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089350)
Visitor Counter : 46