संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी 2 जानेवारी 2025 पासून सुरू होणार तिकीट विक्री
Posted On:
01 JAN 2025 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
प्रजासत्ताक दिन संचलन 2025 आणि बीटिंग रिट्रीटसाठीची तिकीट विक्री येत्या 2 जानेवारी 2025पासून सुरू होणार आहे. तिकीट दरांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
१.
|
प्रजासत्ताक दिन परेड (26.01.2025)
|
100/- आणि 20/-
|
02 जानेवारी 2025 - 11 जानेवारी 2025 9:00 वाजल्यापासून दिवसाचा कोटा संपेपर्यंत.
|
2.
|
बीटिंग रिट्रीट
(फुल ड्रेस रिहर्सल; 28.01.2025))
|
20/-
|
3.
|
बीटिंग रिट्रीट (29.01.2025)
|
100/-
|
तिकीटे थेट खालील पोर्टलवरून खरेदी करता येतील:
- aamantran.mod.gov.in
- 'Aamantran' मोबाइल ॲप. हे ॲप, मोबाइलमधील ॲप स्टोअरमधून किंवा दिलेल्या QR कोडद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते.
तिकीटे मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, किंवा केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले ओळखपत्र इ.) सादर करून खालील पाच ठिकाणांवरील बूथवरून खरेदी करता येतील. प्रजासत्ताक दिन/बीटिंग रिट्रीट सराव समारंभाला भेट देताना हे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक असेल:
|
तिकीट काउंटरचे स्थान
|
तारखा आणि वेळ
|
1
|
सेना भवन
(गेट क्रमांक 2)
|
02 जानेवारी 2025 - 11 जानेवारी 2025
सकाळी 1०:०० ते दुपारी 1:००
दुपारी 2:०० ते 4:३०
|
2
|
शास्त्री भवन (गेट क्रमांक 3 जवळ)
|
3
|
जंतरमंतर (मुख्य दरवाजाजवळ)
|
4
|
प्रगती मैदान (गेट क्रमांक 1)
|
प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 संबंधित अधिक माहिती rashtraparv.mod.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल.
* * *
S.Tupe/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089297)
Visitor Counter : 81