पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याच्या संग्रहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी होणार प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2024 10:27AM by PIB Mumbai
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली.
सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
'महान व्यक्तिमत्व सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. ते द्रष्टे कवी, लेखक, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते. त्यांच्या शब्दांनी असंख्य लोकांमध्ये देशभक्ती आणि क्रांतीची ज्योत पेटवली. समता आणि महिला सक्षमीकरणाबाबतचे त्यांचे पुरोगामी वैचारिक आदर्शही तितकेच प्रेरणादायी आहेत.
आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावरील एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करणार आहे. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मी श्री सीनी विश्वनाथन जी यांचे अभिनंदन करतो.'
***
NM/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2083080)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam