पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कार्याच्या संग्रहाचे प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2024 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग, येथे दुपारी 1 वाजता महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य भारती यांच्या संपूर्ण कार्यावरील संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सुब्रमण्यम भारती यांच्या लेखनाने लोकांमध्ये देशभक्ती जागृत केली, त्यांनी भारतीय संस्कृती आणि देशाच्या आध्यात्मिक वारशाचे सार जनतेपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवले. सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कामांची नोंद 23 खंडांच्या संचांमध्ये केली आहे.हे खंड सीनी विश्वनाथन यांनी संकलित आणि संपादित केले आहेत तर अलायन्स पब्लिशर्सने ते प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांमध्ये सुब्रमण्यम भारती यांच्या लेखनाच्या आवृत्त्या, स्पष्टीकरण, दस्तऐवज, पार्श्वभूमीची माहिती आणि तत्वज्ञानविषयक सादरीकरणाचा तपशील आहे.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2082867)
आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam