युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी डॉ.मनसुख मांडविया यांनी केली मुदतवाढीची घोषणा; आता स्पर्धेत 10 डिसेंबर 2024 पर्यंत सहभागी होता येणार
Posted On:
05 DEC 2024 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2024
देशभरातील युवावर्गातील सहभागींच्या उत्स्फूर्त उत्साह आणि प्रतिसादामुळे, डॉ. मनसुख मांडविया यांनी सध्या सुरू असलेल्या विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम मुदत 10 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदविण्यासाठी युवकांनी ‘माय भारत’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी. (http://www.mybharat.gov.in/) ला भेट देऊ शकतात.
या स्पर्धेसंदर्भामध्ये 18 नोव्हेंबर 2024 रोजी एका पत्रकार परिषदेत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय युवा महोत्सव-2025 ची संकल्पना यंदा "विकसित भारत युवा नेते संवाद" अशी आहे. यामध्ये परिवर्तनात्मक पुनर्कल्पना जाहीर केली आणि तरुणांना आमंत्रित केले. भारताचे भविष्य घडवण्यासाठी आणि तरुणांनी अधिकाधिक संख्येने विकसित भारत प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी भर दिला आहे. या युवा महोत्सवाचे आयोजन पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून केले आहे.
विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा 15 ते 19 या वयोगटातील सर्व तरुणांसाठी खुली आहे. ज्यांना विकसित भारतासाठी त्यांच्या कल्पना सामायिक करण्याची उत्कट इच्छा आहे, त्यांनी या स्पर्धेत जरूर सहभागी व्हावे. भारतातील तरुणांना या अव्दितीय संधीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रश्नमंजुषेतील विजेत्या स्पर्धकांना 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणा-या विशेष समारंभामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ‘विकसित भारता’ विषयीची त्यांची दृष्टी आणि कल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081239)
Visitor Counter : 54