माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कलेला कोणतीही मर्यादा नसते, सीमा नसते, तुम्ही केवळ एकरूप व्हा : चित्रपट निर्माते मधुर भांडारकर
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) पुरस्कार 2024 ज्युरी सदस्यांनी साधला प्रसार माध्यमांशी संवाद.
55 व्या इफ्फी मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज OTT पुरस्कारासाठी दहा प्रवेशिका
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2024
फोटो: सर्वोत्कृष्ट वेब सिरीज OTT पुरस्कार 2024 ज्युरीचे सदस्य (डावीकडून उजवीकडे) कृष्णा हेब्बळे, मधुर भांडारकर आणि हरीश शंकर यांच्यासह सत्र नियंत्रक रिनी चौधरी पत्रकारांशी संवाद साधताना
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या अंतिम पत्रकार परिषदेत, सर्वोत्कृष्ट वेब मालिका OTT पुरस्कार 2024 च्या ज्युरी सदस्यांनी पत्र सूचना कार्यालय माध्यम केंद्र येथे पत्रकार परिषद सभागृहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
"कलेला कोणतीही मर्यादा नसते, सीमा नसते, तुम्ही केवळ एकरूप व्हा. मग ती कोणतीही भाषा असो. आणि मला वाटते की आज जगभरात घडलेली ही एक उत्तम गोष्ट आहे. आता आपल्याला भावभावना समजून घेताना एखादी विशिष्ट भाषा अवगत असणे आवश्यक राहिलेले नाही कारण आता चित्रतल वर्णने ही दिली जातात. त्यामुळे एकप्रकारे मने अगदी उत्तमरीत्या जोडली गेली आहेत" असे ज्युरींचे अध्यक्ष मधुर भांडारकर यांनी आपल्या प्रास्ताविक निवेदनात सांगितले.
दहा प्रवेशिकांमधून एकाच विजेत्याला निवडणे हे किती अवघड काम होते हे सांगताना कृष्णा हेब्बळे यांनी गंमतीने म्हटले की यात कोणतेही शारीरिक व्रण पडले नसले तरी सर्वांनी आपापल्या कलाकृतीच्या निवडीसाठी जोरदार लढा दिला. प्रत्येक ज्युरीने त्यांच्या टिप्पण्या नोंदवून विचारविमर्श केला आणि मोठ्या जोशात आणि खात्रीने युक्तिवादही केला.
ज्युरीमधील सर्वात तरुण हरीश शंकर यांनी सांगितले की “मी कॉलेजमध्ये असताना रांगेत उभा राहून मधुर भांडारकर यांच्या चित्रपटांसाठी तिकीट खरेदी करणाऱ्यांपैकी एक आहे. त्यांच्यासोबत ज्युरी म्हणून बसायला मिळाले हा मी माझा सन्मान समजतो आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे.” केवळ एकच विजेता निवडताना किती अवघड गेले त्याबद्दल तपशीलवार माहिती देताना त्यांनी सांगितले की हे काही खरे वाद नव्हते, तर विचारविनिमयातून एकमत साधण्याचा प्रयत्न होता.
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) पुरस्कार 2024 साठीच्या ज्युरींमध्ये खालील सदस्यांचा समावेश होता:
1. मधुर भांडारकर (अध्यक्ष), चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
2. कृष्णा हेब्बळे, अभिनेते
3. रुपाली गांगुली, अभिनेत्री
4. हरीश शंकर, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
मनोरंजन उद्योगात झालेले लक्षणीय बदल पाहता, विशेषतः ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे, 54 व्या इफ्फी मध्ये सर्वोत्कृष्ट वेब मालिका (OTT) पुरस्कार (2023) सुरु करण्यात आला. या पुरस्काराचामागील हेतू OTT व्यासपीठावरील बहारदार आशय आणि त्यांच्या सर्जकांच्या प्रयत्नांची नोंद घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सन्मान करणे हा आहे. यंदा या पुरस्कारासाठी दहा प्रवेशिका आल्या आहेत. आज संध्याकाळी उशिरा इफ्फीच्या समारोप सोहळ्यात विजेत्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
संवाद येथे पहा:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Bhakti/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078793)
Visitor Counter : 7