माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लष्कर दिन संचलन 2025 ची एक झलक: 55 व्या इफ्फीमध्ये प्रोमोचे अनावरण
पुणे शहराकडे प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2024
पुणे, आपल्या समृद्ध लष्करी वारशासाठी प्रसिद्ध असलेले शहर, 15 जानेवारी 2025 रोजी प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद सांभाळण्यास सज्ज झाले आहे. पुण्याच्या लष्करी इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.
भारतीय लष्कराने सध्या सुरू असलेल्या गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) दरम्यान या आगामी संचलनासाठी प्रमोशनल व्हिडिओचे अनावरण आज केले. याला सिनेफिल्स, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील नेत्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.
भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची 1949 मध्ये झालेली नियुक्ती, जे भारताच्या स्वातंत्र्योत्तर लष्करी नेतृत्वाचे प्रतीक आहे, याच्या स्मरणार्थ हे लष्कर दिन संचलन आयोजित केले जाते. पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरण्यास आरंभ झाला , सुरुवात बेंगळुरूपासून झाली, त्यानंतर 2024 मध्ये लखनौमध्ये आयोजन झाले. 2025 च्या संचलनासाठी झालेली पुण्याची निवड. या शहराचे सशस्त्र दलांशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून असलेली भूमिका अधोरेखित करते.
या वर्षीचे संचलन बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर येथे होणार आहे, ज्यामध्ये मार्चिंग दल, यांत्रिक स्तंभ आणि तांत्रिक प्रदर्शने असतील. ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, लढाऊ प्रात्यक्षिके आणि मार्शल आर्ट्स डिस्प्ले यासारख्या आकर्षक कामगिरीचा समावेश यावर यात भर असेल.
संचलनाच्या आधी, जानेवारीच्या सुरुवातीला पुणे येथे आयोजित “तुमच्या सैन्याला जाणून घ्या” या प्रदर्शनासारख्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना प्रगत शस्त्रास्त्रांचे अवलोकन करता येईल आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी संवाद साधता येईल. असे उपक्रम सर्वसमावेशकता आणि एकतेवर भर देतात, ज्यामुळे लष्कर दिन संचलन हा केवळ एक औपचारिक प्रसंग न राहता धैर्य, समर्पण आणि तांत्रिक प्रगतीचा राष्ट्रीय उत्सव बनतो.
विविध शहरांमध्ये लष्कर दिन संचलन फिरल्याने भारतीय सैन्याचे देशभरातील नागरिकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतात. हा उपक्रम उत्सवाचे विकेंद्रीकरण करतो, स्थानिक समुदायांना थेट सशस्त्र दलांशी संलग्न होण्याची संधी प्रदान करतो.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Nandini/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076661)
Visitor Counter : 17