पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2024 3:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया अमोर मोटली यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे भारत-CARICOM शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. या उच्च-स्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना दुजोरा दिला आणि मजबूत करण्यासाठी संमती दर्शवली.
दोन्ही नेत्यांनी आरोग्य, औषधनिर्मिती, हवामान बदलावर कार्यवाही, संस्कृती आणि परस्पर संबंध यासह अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोटली यांनी भारताच्या दक्षिण आशियाई नेतृत्वाबद्दल प्रशंसा केली. जागतिक संस्थांच्या सुधारणांबाबतही दोन्ही नेत्यांनी यावेळी विचार विनिमय केला.
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2075869)
आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam