पंतप्रधान कार्यालय
"सामूहिक प्रयत्नांमुळे स्वच्छता आणि आर्थिक विवेकशीलतेला चालना देत शाश्वत परिणाम साध्य करता येऊ शकतात" - पंतप्रधान
मोदी यांनी 'विशेष अभियान 4.0' ची केली प्रशंसा, या अभियानाद्वारे देशाला मिळाला 2,364 कोटी रुपयांचा महसूल
Posted On:
10 NOV 2024 1:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विशेष अभियान 4.0' या सर्वात मोठ्या अभियानाची आज प्रशंसा केली. या उपक्रमाद्वारे, केवळ जुन्या टाकाऊ वस्तूंच्या विक्रीतून 2021 पासून देशाच्या तिजोरीमध्ये 2,364 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मोदी यांनी नमूद केले की, सामूहिक प्रयत्नांमुळे शाश्वत परिणाम साध्य होऊ शकतात, यामुळे स्वच्छता आणि आर्थिक विवेकशीलतेलाही चालना मिळते.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या 'एक्स'वरील पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधानांनी लिहिले:
“प्रशंसनीय!
या अभियानाने कुशल व्यवस्थापन आणि सक्रिय कारवाईवर लक्ष केंद्रित करून उत्तम यश संपादन केले आहे. या अभियानाने हे दाखवून दिले की, सामूहिक प्रयत्नांमुळे स्वच्छता आणि आर्थिक विवेकशीलतेला प्रोत्साहन मिळते आणि शाश्वत परिणाम देखील साध्य करता येतात.”
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2072164)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam