पंतप्रधान कार्यालय
अल्मोडा रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
पीएमएनआरएफ मधून मदत जाहीर
Posted On:
04 NOV 2024 2:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला,त्यांचे कुटुंबिय आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त केला आहे. @PMOIndia ने समाज माध्यमावर सामायिक केलेल्या एका संदेशात, पंतप्रधानांनी पीडित कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केले आणि अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारण व्हावी अशी आशा व्यक्त केली.
"उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो.सर्व जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
S.Tupe/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070569)
Visitor Counter : 41
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam