पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2024 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पासुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांना त्यांच्या गुरू पूजेनिमित्तानेआदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी पासुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या विचारांचा आणि शिकवणीचा गौरव केला. पासुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांनी नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
"सर्वत्र पूजनीय आणि आदरणीय पासुम्पोन मुथुरामलिंग थेवरजी यांना गुरुपूजेच्या निमित्ताने आदरांजली. असंख्य लोक त्यांचे विचार आणि शिकवणीतून बळ प्राप्त करतात. त्यांनी गरीबी निर्मूलन, अध्यात्म आणि शेतकऱ्यांचे कल्याण यावर लक्ष केंद्रित करून, आपला समाज अधिक चांगला बनवण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम केले. त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2069600)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam