पंतप्रधान कार्यालय
लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा
Posted On:
27 OCT 2024 11:08AM by PIB Mumbai
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन केले.
अर्जुन एरीगैसी याच्यामुळे जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली असून यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल; असे म्हणत मोदी यांनी अर्जुनच्या असाधारण प्रतिभा आणि चिकाटीचे कौतुक केले आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अर्जुन एरिगैसी अभिनंदन! हे एक अप्रतिम यश आहे. त्याच्या असाधारण प्रतिभा आणि चिकाटीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. अर्जुन याचे हे यश त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मैलाचा दगड असून यामुळे अनेक तरुणांना बुद्धिबळ खेळण्यास आणि जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी सुद्धा हे यश प्रेरणा देईल. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी सर्वोत्तम शुभेच्छा!"
***
NM/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068645)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam