माहिती आणि प्रसारण मंत्रालय
PB-SHABD द्वारे 24/7 बातम्या, 1500 हून अधिक रिपोर्टर, लाइव्ह फीड, आणि सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील लेखी, व्हिडिओ, छायाचित्र आणि ऑडिओ स्वरूपातील लोगो मुक्त सामुग्री संपूर्ण भारतात सहज उपलब्ध होणार
Posted On:
24 OCT 2024 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
डिजिटल न्यूज पोर्टलना आता पुढील लिंक वर केवळ एक साइन-अप फॉर्म भरून पीबी-शब्द (PB-SHABD) पोर्टलवर आपली नोंदणी करता येईल:
https://shabd.prasarbharati.org/register पीबी-शब्द (PB-SHABD) पोर्टलवर डिजिटल न्यूज पोर्टलना संपूर्ण भारतात, सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील लिखित, व्हिडिओ, छायाचित्र आणि ऑडिओ स्वरूपातील लोगो मुक्त सामुग्री मिळवता येईल. माध्यम संस्थांना साइन अप करण्यासाठी आणि मार्च 2025 पर्यंत वापरण्यासाठी ही सेवा विनामूल्य आहे.
YouTube-आधारित डिजिटल न्यूज पोर्टलसाठी सदस्यतेचे निकष:
1. इंग्रजी/हिंदीमधील पोर्टलचे किमान 1,00,000 सदस्य असणे आवश्यक आहे.
2. प्रादेशिक न्यूज पोर्टल्सचे किमान 50000 सदस्य असणे आवश्यक आहे.
3. Youtube खाते सत्यापित करणे आवश्यक आहे.
4. पोर्टल कमीतकमी एक वर्षापासून अस्तित्वात असायला हवे.
5. अर्ज भरण्याच्या वेळेपूर्वी पोर्टलवर दर महिन्याला किमान 1 व्हिडिओ आणि मागील एका महिन्यात किमान 5 व्हिडिओ अपलोड केलेले असावेत.
डिजिटल न्यूज पोर्टलद्वारे डिजिटल प्रोफॉर्मा भरावा, त्यानंतर त्याची प्रसार भारती येथे अंतर्गत पडताळणी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच, डिजिटल न्यूज पोर्टल्स पीबी-शब्द (PB-SHABD) साठी नोंदणी करू शकतील.
पीबी-शब्द (PB-SHABD)
प्रसार भारती-शेअर्ड ऑडिओ-व्हिज्युअल्स फॉर ब्रॉडकास्ट अँड डिसेमिनेशन (PB-SHABD), ही बातम्या सामायिक करणारी सेवा म्हणून 13 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आली. माध्यम संस्थांना व्हिडिओ, ऑडिओ, लिखित आणि फोटोंसह विविध स्वरूपातील दैनिक बातम्या पुरवण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे.
सर्वसमावेशक व्याप्तीसाठी विस्तृत नेटवर्क :
60 समर्पित संपादन डेस्कद्वारे समर्थित, 1500 हून अधिक पत्रकार, वार्ताहर आणि स्ट्रिंगर्सच्या मजबूत जाळ्याचा लाभ घेत, चोवीस तास कार्यरत असलेले पीबी-शब्द भारताच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या उपलब्ध करते . कृषी, तंत्रज्ञान, परराष्ट्र व्यवहार आणि राजकीय घडामोडी अशा 50 हून अधिक बातम्यांच्या श्रेणींचा समावेश असलेल्या 1000 हून अधिक बातम्या सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये प्रादेशिक वृत्त विभाग आणि मुख्यालयाकडून एकत्रितपणे दररोज अपलोड केल्या जातात.
पीबी-शब्द ची ठळक वैशिष्ट्ये :
पीबी-शब्द द्वारे प्रदान केलेला आशय लोगो-मुक्त आहे आणि या व्यासपीठावरील आशय वापरण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त, या सेवेमध्ये लाइव्ह फीड हे वैशिष्ट्य समाविष्ट आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनातील राष्ट्रीय पुरस्कार समारंभ, निवडणूक रॅली, महत्त्वाचे राजकीय कार्यक्रम आणि विविध पत्रकार परिषदा यासारख्या थेट कार्यक्रमांचे विशेष कव्हरेज प्रदान केले जाते आणि या सर्व चित्रफिती कोणत्याही लोगोशिवाय उपलब्ध करून दिल्या जातात.
आशयाची उपलब्धता अधिक वाढविण्यासाठी, अभिलेखीय संग्रहालय म्हणून मीडिया रिपॉझिटरी विकसित केली जात आहे, ज्यामुळे सदस्यांना विशेष क्युरेटेड पॅकेजेससह दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या संग्रहातून दुर्मिळ आणि संग्रहित फुटेज सहज मिळू शकेल.
नवीनतम अद्यतनांसाठी X आणि Instagram वर पीबी-शब्द ला फॉलो करा.
अधिक अपडेटसाठी, X (पूर्वीचे ट्विटर) https://x.com/PBSHABD या लिंकवर तर Instagram च्या https://www.instagram.com/pbshabd/ या लिंकवर पीबी-शब्द उपलब्ध आहे.
S.Kane/R.Agashe/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067922)
Visitor Counter : 54