माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी (IFFI) 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाची समृद्ध चित्रपट परंपरा आणि गतिशील सिनेमा संस्कृतीचा उत्सव साजरा होणार
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “कंट्री ऑफ फोकस” म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड
ऑस्ट्रेलिया-भारत सह-निर्मिती पॅनल 'फिल्म बझार’ मध्ये सहकार्याच्या संधी शोधणार
इफ्फी (IFFI) 2024 मध्ये अकादमी पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सील यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर क्लासचे आयोजन
#IFFIWood, 23 ऑक्टोबर 2024
गोव्यामध्ये 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” म्हणून नामांकन मिळाल्याचे घोषित करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला अभिमान वाटत आहे. ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक चित्रपट उद्योगातील प्रभावशाली योगदानाचा उत्सव साजरा करणे, त्याची कथा कथनाची समृद्ध परंपरा, गतिशील चित्रपट संस्कृती आणि नवोन्मेषी सिनेमॅटिक तंत्रांवर प्रकाश टाकणे, हे या विशेष सन्मानाचे उद्दिष्ट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे यापूर्वीच ऑडिओ व्हिज्युअल (दृक-श्राव्य) सह-उत्पादन कराराचे सदस्य आहेत.
इफ्फी (IFFI) महोत्सवातील ‘कंट्री ऑफ फोकस’
"कंट्री ऑफ फोकस" विभाग हे इफ्फी (IFFI) चे प्रमुख वैशिष्ट्य असून, ते देशाचे सर्वोत्कृष्ट समकालीन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी समर्पित व्यासपीठ प्रदान करते. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी सिनेमावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे, ज्यामुळे यंदा या विभागासाठी ऑस्ट्रेलियाची निवड यथायोग्य ठरली आहे. हा समावेश भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट उद्योगांमधील मजबूत सहकार्य प्रतिबिंबित करतो.
ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे प्रदर्शन
इफ्फी (IFFI) महोत्सवात काळजीपूर्वक निवड करण्यात आलेल्या सात ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे खेळ आयोजित केले जातील, ज्यामध्ये समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेले नाट्य-चित्रपटांपासून, ते प्रभावशाली माहितीपटांपर्यंत, दृष्टी खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर्स पासून, ते हलक्या-फुलक्या विनोदी चित्रपटांपर्यंत, विविध शैलींचे मिश्रण सादर केले जाईल. हे चित्रपट ऑस्ट्रेलियाची अनोखी सांस्कृतिक ओळख प्रदर्शित करतील, ज्यामधून तिथल्या स्थानिक आणि समकालीन समुदायांच्या कथांचा झळाळता परिप्रेक्ष प्रतिबिंबित होईल.
फिल्म बझार मधील सहभाग
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियाई चित्रपट सृष्टीच्या सर्वात मोठ्या ‘फिल्म बझार’ मध्ये ऑस्ट्रेलियन चित्रपट सृष्टीचा मोठा सहभाग असेल, ज्यामध्ये स्क्रीन ऑस्ट्रेलिया, स्टेट स्क्रीन कमिशन आणि ऑसफिल्म, या ऑस्ट्रेलियाला चित्रीकरणाचे स्थळ म्हणून प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होईल. विशेष फिल्म ऑफिस प्रदर्शन विभागात, ते ऑस्ट्रेलियातील चित्रीकरणासाठी योग्य स्थळे, आणि प्रोत्साहनपर सवलती याबद्दल माहिती दिली जाईल. चित्रपट बझार मध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि सह-निर्मितीच्या संधी शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून अर्थसहाय्य मिळालेल्या सहा चित्रपट निर्मात्यांचे शिष्टमंडळ देखील फिल्म बझारमध्ये सहभागी होईल. फिल्म बझार मध्ये विशेष ऑस्ट्रेलियन सह-निर्मिती दिवस देखील असेल. या ठिकाणी दोन्ही देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिनिधींना एकमेकांशी नेटवर्कची (संपर्क) संधी दिली जाईल. फिल्म बझार मध्ये ‘होम बिफोर नाईट’ या ऑस्ट्रेलियन प्रकल्पाची सह-उत्पादन बाजारपेठेतील अधिकृत प्रवेशांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय तसेच ऑस्ट्रेलियन चित्रपट उद्योग यांच्यामधील वाढत्या सहकार्याच्या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया इंडिया चित्रपट सहनिर्मिती मंडळ, एक समर्पित पॅनेल चर्चा घडवून आणेल ज्याचा भर दोन्ही देशांमधील सहनिर्मितीच्या संधीबद्दलच्या ज्ञानमालिकेवर असेल. निर्माते आणि या उद्योगातील तज्ञ यांच्या वैशिष्ट्यांनुसार हे पॅनेल सह-निर्मितीच्या तर्कशुद्ध बाबींचा तसेच आधीच्या यशस्वी निर्मितींचा उहापोह करेल.
सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल यांचा मास्टरक्लास
मॅड मॅक्स: फ्युरी रोड आणि इंग्लिश पेशंट यासारख्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या कामासाठी ओळखले जाणारे आणि अकॅडमी पारितोषिक विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल घेणार असलेला मास्टरक्लास हे मुख्य आकर्षण असेल. हे सत्र त्यांच्या कला क्षेत्रातील प्रवासावर प्रकाश टाकेल तसेच उदयोन्मुख फिल्म निर्मात्यांना आणि फिल्म क्षेत्रात स्वारस्य असणाऱ्या इतरांना अमूल्य तांत्रिक अंतर्दृष्टी प्रदान करेल.
55 वा IFFI हा जागतिक सिनेमाचा आनंददायी सोहळा असणार आहे, ज्यामध्ये जगभरातील निवडक सिनेमांचे मिश्रण, पॅनेल चर्चा, गुंतवून ठेवणाऱ्या कार्यशाळा आणि विशेष चित्रपटांचे प्रदर्शन या सर्वांचा समावेश असेल.
सांस्कृतिक देवाणघेवाण हे लक्ष्य तसेच देशांच्या सीमा ओलांडून जाणाऱ्या चित्रपटांशी संबंधित कलांना प्रोत्साहन हे IFFIचे उद्देश यावर्षी ‘कंट्री ऑफ फोकस’ असणारा ऑस्ट्रेलिया नक्कीच साध्य करेल.
1952 मध्ये सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवापैकी एक आहे, जो जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांचे काम प्रदर्शित करण्यासाठीचा एक मंच म्हणून काम करतो. दरवर्षी गोवा इथे भरवण्यात येणारा IFFI, (भारतीय चित्रपट महोत्सव) हा दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, तसेच चित्रपटप्रेमींसाठी जागतिक सिनेमातील सर्वोत्कृष्टता साजरा करण्याचा उत्सव आहे.
PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067356)
Visitor Counter : 113
Read this release in:
Malayalam
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Tamil
,
Telugu
,
Kannada