राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय आदिम जाति सेवक संघाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा संपन्न
Posted On:
22 OCT 2024 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (22 ऑक्टोबर 2024) नवी दिल्ली येथे भारतीय आदिम जाति सेवक संघाचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन (75 वर्षपूर्ती) सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, त्यांची ठक्कर बापा स्मारक सदनाची भेट म्हणजे एखाद्या पवित्र स्थळाला भेट देण्यासारखे आहे असे राष्ट्रपतींनी यावेळी उद्धृत केले. त्यांनी ठक्कर बापांना आदरांजली वाहिली.
भारतीय आदिम जाती सेवक संघ ठक्कर बापांचा आदर्श घेऊन काम करत आहे हे नमूद करताना राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. आदिवासी समाजात प्रचलित असलेली गरिबी, निरक्षरता आणि अनारोग्य या मुद्द्यांवर हा संघ काम करतो. हा संघ मुली आणि महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. ठक्कर बापांनी प्रस्थापित केलेल्या जनसेवेच्या आदर्शाचे पालन करून भारतीय आदिम जाती सेवक संघाशी निगडित लोक भविष्यातही समर्पित भावनेने सदैव काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067201)
Visitor Counter : 46