संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्जन व्हाइस ॲडमिरल कविता सहाय, एसएम, व्हीएसएम यांनी महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल) म्हणून कार्यभार स्वीकारला

Posted On: 14 OCT 2024 2:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024

सर्जन व्हाइस ॲडमिरल कविता सहाय, एसएम, व्हीएसएम यांनी 14 ऑक्टोबर 24 रोजी महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल) म्हणून पदभार स्वीकारला. 30 डिसेंबर 1986 रोजी या फ्लॅग ऑफिसरची लष्करी वैद्यकीय विभागात नियुक्ती करण्यात आली होती. पुणे येथील प्रतिष्ठित सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान महाविद्यालयामधून पॅथॉलॉजीमध्ये विशेष आणि ऑन्कोपॅथॉलॉजीमध्ये अतिविशेष प्राविण्य मिळवले आहे.  त्या आर्मी हॉस्पिटल रिसर्च आणि रेफरल आणि बेस हॉस्पिटल दिल्ली कँट मधील प्रयोगशाळा विज्ञान विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख आहेत. त्या एएफएमसी, पुणे येथे पॅथॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. त्या लष्करी वैद्यकीय विभाग केंद्र आणि महाविद्यालय आणि O i/C रेकॉर्डच्या पहिल्या महिला कमांडंट होत्या. लष्करी वैद्यकीय विभागाच्या कर्नल कमांडंट म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांना वैद्यकीय शिक्षणात विशेष स्वारस्यी आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना वर्ष 2013-14 मध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया येथील प्रतिष्ठित फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (FAIMER) या संस्थेने फेलोशिप दिली आहे.

ध्वज अधिकारी व्हाइस ॲडमिरल कविता सहाय यांना उत्कृष्ट सेवेसाठी,2024 मध्ये सेना पदक आणि 2018 मध्ये विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे आणि 2008 आणि 2012 मध्ये दोन वेळा लष्करप्रमुख आणि 2010 मध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पश्चिम कमांड) यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2064643) Visitor Counter : 35