श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ईएसआयसी) 194 वी बैठक संपन्न
येत्या 5 वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमात 75,000 नव्या जागांची निर्मिती करण्यासंदर्भात पंतप्रधानांनी यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या निर्धाराला पाठबळ पुरवत महाराष्ट्रात अंधेरीसह देशभरात 10 नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणार असल्याची केंद्रीय मंत्र्यांची घोषणा
अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेला 01.07.2024 पासून 30.06.2026 पर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय
Posted On:
08 OCT 2024 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024
केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत ईएसआयसी मुख्यालय येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ईएसआयसी) 194 वी बैठक झाली. केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे देखील या बैठकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ईएसआयसीविषयक पायाभूत सुविधा तसेच ईएसआयसीकरून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीत ईएसआय महामंडळासाठीच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
10 नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना
देशभरात अंधेरी (महाराष्ट्र),बसाईदरापूर(दिल्ली), गुवाहाटी-बेल्तोला (आसाम), इंदोर (मध्य प्रदेश),जयपूर (राजस्थान), लुधियाना (पंजाब), नरोडा-बापूनगर(गुजरात), नोईडा आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) तसेच रांची (झारखंड) अशा 10 ठिकाणी नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यास ईएसआय महामंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.
येत्या 5 वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमात 75,000 नव्या जागांची निर्मिती करण्यासंदर्भात पंतप्रधानांनी यावर्षीच्या (2024) स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेला अनुसरून हा निर्णय आहे.
अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेला 01.07.2024 पासून 30.06.2026 पर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ
काही कारणाने बेरोजगार झालेल्या विमाधारक व्यक्तीला दिलासा देण्यासाठी ईएसआयसीमध्ये 01.07.2018 पासून दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर “अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना” सुरु करण्यात आली होती. विमाधारक व्यक्ती उपजीविकेच्या नव्या संधींच्या शोधत असतानाच्या कालावधीत बेरोजगारी भत्त्याच्या स्वरुपात त्याला आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश होता.
या योजनेच्या अंमलबजावणीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा ही योजना आणखी एका वर्षासाठी म्हणजे 01.07.2020 ते 30.06.2021 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 30.06 2022 पर्यंत आणि आता 30.06.2024 पर्यंत या योजनेच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्याशिवाय या योजनेचा कालावधी 01.07.2024 ते 30.06.2026 या दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि ईएसआयसीचे एकत्रीकरण कार्यक्रमांतर्गत देशभरातील ईएसआयसी च्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशाच्या दुर्गम भागातील ईएसआयसी च्या लाभार्थ्यांना आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (AB-PMJAY) सूचीबद्ध करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणे सुलभ होईल. पीएमजय (PMJAY) अंतर्गत सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये ईएसआयसी च्या विमाधारक व्यक्तींसाठी उपचारांच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल.
ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पॅरा-मेडिकल आणि बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमांची सुरुवात
ईएसआय कॉर्पोरेशनने अलवर (राजस्थान), बिहता (बिहार), फरिदाबाद (हरियाणा), जोका (पश्चिम बंगाल), के.के. नगर (तामिळनाडू), सनथनगर (तेलंगणा) आणि राजाजीनगर (कर्नाटक) या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पॅरा-मेडिकल आणि बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु करायला मान्यता दिली आहे.
एम्स (AIIMS भर्ती) धोरणाच्या अनुषंगाने NORCET द्वारे नर्सिंग ऑफिसरची भरती
ईएसआय कॉर्पोरेशनने एम्स (AIIMS) भर्ती धोरणाच्या अनुषंगाने, एम्स (AIIMS) द्वारे आयोजित NORCET द्वारे नर्सिंग अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया आयोजित करण्यासाठी, नर्सिंग ऑफिसर पदासाठी भरतीचे धोरण स्वीकारायला मान्यता दिली आहे. यामुळे ईएसआयसी रुग्णालये/महाविद्यालये आणि दवाखान्यांमध्ये परिचारिकांची कमतरता भासणार नाही.
ईएसआय कॉर्पोरेशनने विविध ठिकाणी रुग्णालये/दवाखाने/डीसीबीओच्या बांधकामासाठी जमीन संपादन करायला मान्यता दिली.
नियमांचे विश्लेषण केल्यावर आणि विमाधारक कामगारांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ईएसआयसीच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केल्यावर, महामंडळाने पुढील प्रकल्पांच्या बांधकामासाठी जमीन संपादन प्रस्तावांना मंजुरी दिली:-
(i) आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर येथे 100 खाटांचे ईएसआय रुग्णालय
(ii) उत्तर प्रदेशमध्ये फतेहपूर येथे 01डॉक्टर दवाखाना
(iii) उत्तर प्रदेशमध्ये प्रतापगड येथे DCBO
(iv) महाराष्ट्रात पुणे येथे 350 खाटांचे ईएसआय रुग्णालय
(v) आसामध्ये धुबरी येथे ईएसआय दवाखाना आणि शाखा कार्यालय
(vi) बिहारमध्ये मुझफ्फरपूर येथे 100 खाटांचे ईएसआय रुग्णालय
(vii) उत्तर प्रदेशमध्ये औरैया येथे DCBO
या बैठकीत सध्या सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि वैद्यकीय सेवा, प्रशासन, आर्थिक बाबींमधील सुधारणांशी संबंधित विविध प्रधान्यक्रमांवर चर्चा झाली.
N.Chitale/S.Chitnis/R.Agahe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063325)
Visitor Counter : 96