पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले "आवती कळाय माडी वया कळाय" हे त्यांनी स्वतः लिहिलेले गीत
मोदी यांनी गायिका पूर्वा मंत्री यांना सुरेल गरबा गीत सादर केल्याबद्दल दिले धन्यवाद
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2024 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "आवती कळाय माडी वया कळाय" हे त्यांनी देवी दुर्गेच्या सन्मानार्थ स्वतः लिहिलेले गीत सामायिक केले.
मोदी यांनी गायिका पूर्वा मंत्री यांनाही हे गाणे गायल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर खालील संदेश पोस्ट केला आहे.
"नवरात्रीच्या या मंगल काळात आणि लोक वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र येऊन माता दुर्गेची विविध पद्धतीने भक्ती करतात. या सर्व प्रथा परंपरा आणि आनंद यामुळे प्रेरित होऊन #AavatiKalay हे गीत मी तिच्या शक्ति आणि सामर्थ्याला अभिवादन म्हणून लिहिले आहे. आपल्या सर्वांवर तिची कृपा अशीच कायम राहो. पूर्वा मंत्री या गुणी उगवत्या गायिकेला गरबा आणि #AavatiKalay या गीताचे सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद."
* * *
JPS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2062777)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam