पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भिक्खू संघाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

प्रविष्टि तिथि: 05 OCT 2024 9:22PM by PIB Mumbai

 

मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तसेच पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:

मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी माझी भेट घेतली तसेच पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.  त्यांनी पाली भाषेच्या बौद्ध धर्माशी असलेल्या दृढ संबंधांचे स्मरण करून दिले आणि आगामी काळात अधिकाधिक तरुण पाली भाषेचे ज्ञान मिळवतील असा विश्वास व्यक्त केला.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2062548) आगंतुक पटल : 92
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam