माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आकाशवाणीने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा एक भाग म्हणून व्यापक प्रमाणावर प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिरे, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे आणि योग प्रशिक्षण सत्राचे केले आयोजन


या प्रयत्नांमुळे आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढेल, आरोग्यदायी पद्धतींना प्रोत्साहन मिळेल आणि सर्वांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यात हातभार लागेल

Posted On: 03 OCT 2024 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

 

स्वच्छता ही सेवा 2024 मोहिमेचा   एक भाग म्हणून, आकाशवाणी, नवी दिल्ली ने  1-2 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सफाई मित्रांसाठी  व्यापक प्रमाणात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिरे, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे आणि योग प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले होते. या मोहिमेअंतर्गत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी आकाशवाणी परिसरात आपल्या  स्वच्छता नायकांसाठी  अनेक रुग्णालयांद्वारे मोफत नेत्र, दंत, स्त्रीरोग, त्वचा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि सामान्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती.

सफाई मित्रांच्या आरोग्यासाठी आकाशवाणी आणि ईएसआयसी आले एकत्र

सफाई मित्रांसोबत दीर्घकालीन सहकार्यासाठी ईएसआयसी  रुग्णालय  आणि वैद्यकीय महाविद्यालय, फरिदाबाद (NIT) यांच्यासोबतही सहकार्यात्मक संबंध स्थापन करण्यात आले. ईएसआयसीने आपल्या  सफाई मित्रांसाठी प्रत्यक्ष नोंदणी, सामान्य डॉक्टरांकडून  सामान्य सल्ला आणि प्रिस्क्रिप्शनसाठी ओपीडी स्लिप्स आणि तज्ञांच्या सल्ल्यासाठी (आवश्यकतेनुसार) संदर्भ दिले आहेत. प्रत्येक सफाई मित्रासाठी त्यांचे सर्व प्रिस्क्रिप्शन आणि चाचणी अहवाल व्यवस्थित ठेवण्यासाठी वैद्यकीय फाइल तयार करण्यात आली.

मोफत आरोग्य चाचण्या आणि आभा  नोंदणी

संकुलात कार्यरत 200 स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, आऊटसोर्स ड्रायव्हर्स आणि एमटीएस कर्मचाऱ्यांसाठी डॉ. लाल पॅथलॅब्सकडून रक्त तपासणीची  मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 1 ऑक्टोबर रोजी, आकाशवाणी भवन येथे सफाई मित्र आणि प्रसार भारतीच्या इतर कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत पीएमजेएवाय  आणि आभा कार्ड लाभांबाबत  जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि  थेट प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तसेच पात्र लाभार्थींसाठी नवीन नावनोंदणी करण्यासाठी एका बूथची स्थापना करण्यात आली होती.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण आणि फसवणूक संबंधी जागरूकता सत्र

स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये योगाच्या लाभांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, कार्यालयातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीच्या सहकार्याने योग प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या सहकार्याने फसवणूक संबंधी जागरूकता बाबत एक संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले होते. यात सुमारे पन्नास अधिकारी उपस्थित होते.

सुरक्षा शिबिरात महिला सफाई मित्रांसाठी मोफत स्त्रीरोग तपासणी

सुरक्षा शिबिरात आर्टेमिस रुग्णालय, गुरुग्राम यांच्या सहकार्याने महिला सफाई मित्रांची  मोफत स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश स्वच्छता कामगारांमध्ये महिलांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे, त्यांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मिळतील याची खात्री करणे हा आहे.  या कार्यक्रमाने केवळ महत्त्वाच्या आरोग्य सेवाच दिल्या नाहीत तर महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरुकताही वाढवली, सफाई मित्रांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि नियमित वैद्यकीय तपासणीसाठी प्रोत्साहित केले.

सुरक्षा शिबिरात सफाई मित्रांसाठी मोफत नेत्रतपासणीची सुविधा देण्यात आली

आपल्या सफाई मित्रांसाठी परिपूर्ण 6/6 दृष्टी सुनिश्चित  करण्याच्या उद्देशाने  सुरक्षा शिबिर दरम्यान मेसर्स लॉरेन्स आणि मेयो यांनी मोफत नेत्र तपासणी सुविधा देऊ केली होती. या उपक्रमाने  स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच त्यांना दृष्टी संबंधी अत्यावश्यक देखभाल सुलभ केली.

आकाशवाणी संचालनालयात स्वच्छता सेल्फी पॉइंट स्थापन

स्वच्छतेला चालना देण्यासाठी आणि स्वच्छ भारत अभियानात सामुदायिक  सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आकाशवाणी संचालनालयात एक 'स्वच्छता सेल्फी पॉइंट' स्थापन करण्यात आला आहे. हा आकर्षक उपक्रम कर्मचारी आणि अभ्यागतांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी आमंत्रित करतो, स्वच्छता  राखण्यात अभिमानाची भावना वृद्धिंगत करतो. #SwachhataSelfie या हॅशटॅगसह त्यांचे सेल्फी सोशल मीडियावर शेअर करून, सहभागी स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करू शकतात आणि इतरांना चळवळीत सामील होण्यासाठी प्रेरित करू शकतात.

स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत आकाशवाणीचे विविध उपक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणाप्रति दृढ वचनबद्धता दर्शवतात. व्यापक प्रमाणात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिरे, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे आणि योग प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करून, आकाशवाणी केवळ शारीरिक आरोग्याला प्रोत्साहन देत नाही तर कामगारांमध्ये समुदाय आणि मदतीच्या भावनेला प्रोत्साहन देते.  या प्रयत्नांमुळे आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढेल , आरोग्यदायी पद्धतींना प्रोत्साहन मिळेल  आणि सर्वांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण  करण्यात हातभार लावेल.

Social Media Links of Directorate:

Social Media Links by some of the Field Stations:

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2061578) Visitor Counter : 46